शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

विदारक ! नदीवर पूल नसल्याने रुग्णवाहिका थांबली, अखेर बैलगाडीतून नेला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2021 12:02 IST

सेलू तालुक्यातील नरसापुर येथील करपरा नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थांचे हाल

ठळक मुद्देअनेक पिढ्यांची जीवघेणी कसरत सुरूच

देवगावफाटा (परभणी ) : पावसाळ्यात करपरा नदीला पूर आला की नरसापुरचा दहादहा दिवस संपर्क तुटतो. १८ सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथून एका रुग्णवाहिकेतून आणलेला मृतदेह पूल नसल्याने थेट गावात नेता आला नाही. शेवटी बैलगाडीतून मृतदेह नदीतून न्यावा लागला. अनेकदा तर लेकरा-बाळांना डोक्यावर घेऊन कंबरे इतक्या पाण्यातून नदीपार करावी लागते. येथील अनेक पिढ्यांनी नेते व अधिकाऱ्यांच्या हातापाया पडल्यानंतरही आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नाही अशा व्यथा ग्रामस्थानी मांडल्या.

सेलू तालुक्यातील ५६०  लोकवस्तीचे नरसापुर हे गाव आहे. एका बाजुला तलाव तर तिन्ही बाजुने करपरा नदीचा वेढा आहे. नरसापुर ते बोरकीनी रस्त्यावर ही नदी आडवी येते. येथील भिमराव उकंडी शेळके यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह १८ सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथून रुग्णवाहिकेतून गावाकडे आणण्यात आला. मात्र, करपरा नदीला कंबरेइतके पाणी असल्याने रुग्णवाहिका पुढे गेली नाही. शेवटी मृतदेह बैलगाडीद्वारे नदीपार करून गावात आणण्यात आला. 

पूल नसल्याने पूर किंवा पाणी वाढले की येणे - जाणे बंद होते. कधीकधी तर १५  दिवस अनेक गावांचा संपर्क तुटतो. ग्रामस्थांनी अनेकदा पूल उभारणीची मागणी केली. परंतु, आश्वासन व सर्वेक्षण यापुढे काहीच झाले नाही. प्रशासन व लोकप्रतिनिधी पूल उभारणीसाठी प्राधान्याने प्रयत्न करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ग्रामस्थांचे हाल आणि अतोनात नुकसान पाऊस आला की,गावचा संपर्क तुटतो. पावसाळ्यात दोन दोन महिने सायकल, दुचाकीदेखील नेता येत नाही. शेतकऱ्यांच्या शेतीमालाची वाहतूक करता येत नाही. गावातील दूध उत्पादकांना दुध डोक्यावर न्यावे लागते. ७५ वर्षापासूनचा हा प्रश्न कधी सुटणार.- प्रसाद जावळे, ग्रामस्थ, नरसापुर

या पूर्वीच्या घटना : - यापूर्वी ११ आँक्टोबर २०२० रोजी येथील युवकाला सर्पदंश झाल्याने करपरा नदिच्या पुरातून नेतांना १४ यूवकांना आर्धातास कसरत करावी लागली त्यानंतर जालना येथे उपचार घेऊन हा युवक बरा झाला होता.- २२ जुलै २०२१ रोजी ही बोरकीनी येथील शेतकरी अर्जून मुसळे हे या नदिच्या पुरात वाहुन जात असतांना ४ युवकांनी दोरखंड च्या सहाय्याने त्यांना बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले होते.

टॅग्स :parabhaniपरभणीriverनदी