शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरांवर एकात्मिक वृक्ष लागवड करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 18:03 IST

कमी पाण्यात, कमी जागेत आणि लवकर वाढणारी पारंपारिक झाडे लावण्यावर नागरिकांनी भर दिला पाहिजे़

- प्रसाद आर्वीकर

पावसाळा आला की वृक्ष लागवड  मोहिमा सुरू होतात़ मात्र ही झाडे टिकत नाहीत आणि पूर्वीसारखीच परिस्थिती पुन्हा निर्माण होते़ तेव्हा वृक्ष लागवड करताना काय काळजी, कोणती झाडे कोणत्या ठिकाणी लावावीत आणि पर्यावरण संवर्धनासाठी नेमक्या कशा पद्धतीने वृक्षारोपण करावे, याविषयी येथील तज्ज्ञ प्रा. डॉ. सुनील मोडक यांच्याशी साधलेला संवाद... 

वृक्षारोपण करण्यासाठी कोणत्या जागा निवडाव्यात?वृक्षारोपण करण्यासाठी शक्य तो शासकीय मोकळ्या जागा, माळरान आणि डोंगरी भाग निवडला पाहिजे़ आपल्या भागात येणारी खैर, बाभूळ, पळस, बिबा, विलायती चिंच, कोंदन, वड, पिंपळ, फणस ही झाडे लावण्यास प्राधान्य द्यावे़ शहराबाहेर रस्त्याच्याकडेला मोठी उंच वाढणारी झाडे लावावीत़ 

कशा पद्धतीने वृक्षारोपण करावे?  वृक्षारोपण करताना जागा योग्य पद्धतीने निवडणे गरजचे आहे़ पारंपारिक झाडे फांदी पद्धतीने, कलम पद्धतीने किंवा साध्या पद्धतीने लावली तरी चालतात़ छोटे, मध्यम आणि उंच वाढणारी झाडे लावावीत़ झाड निवडताना ते आपल्या भागात वाढणारे असावे़ डोंगरावर मोठी झाडे जगत नाहीत़ तेव्हा छोटी झुडपे लावली पाहिजेत़ ही झुडपे माती धरून ठेवतात आणि झुडपे वाढल्यानंतर मोठी झाडे या भागात लावल्यास वनराई वाढण्यास मदत होऊ शकते.  नदी-नाल्यांच्या परिसरात वेडी बाभळ, इंगन बेट, हिवरी ही झाडे लावावीत.

संवर्धनाची जबाबदारी देणे गरजेचेशहरी भागात महापालिकेच्या मालकीच्या मोकळया जागा झाडे लावण्यासाठी निवडाव्यात़ त्या ठिकाणी सर्व प्रकारची झाडे लावून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी एखाद्या संस्थेवर दिल्यास झाडे जगू शकतात़ त्यांचे योग्य पद्धतीने संवर्धनही होऊ शकेल़ वृक्ष लागवड मोहिमेवर मोठा खर्च होतो़ मात्र ही झाडे टिकत नाहीत़ तेव्हा एक झाड लावण्यासाठी येणारा खर्च आणि त्याच्या संगोपनाचे मानधन थेट नागरिकांना दिले तर वृक्षसंवर्धन होऊ शकते़

टॅग्स :parabhaniपरभणीNatureनिसर्गRainपाऊस