शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

दुकानातील चोरीच्या घटनेचा पाच तासात उलगडा, साडेतीन लाखाच्या मुद्देमालासह आरोपी ताब्यात

By राजन मगरुळकर | Updated: July 9, 2023 15:30 IST

चोरीच्या घटनेतील आरोपीचा शोध स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अवघ्या पाच तासात लावला.

राजन मंगरुळकर, परभणी: शहरातील जिंतूर रोड भागातील सुपर शॉपीमध्ये झालेल्या चोरीच्या घटनेतील आरोपीचा शोध स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अवघ्या पाच तासात लावला. गुन्हा उघड करून संबंधित आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून तीन लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिंतूर रोड भागातील महालक्ष्मी ग्राहक पेठ या दुकानात शनिवारी पहाटे चोरी झाल्याची तक्रार नानलपेठ ठाण्यात देण्यात आली. त्यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. सदर गुन्ह्याची दखल घेत पोलीस अधीक्षक रागसुधा.आर.यांनी स्थानिक गुन्हा शाखा व सायबर विभागाला सूचना देत गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण यांनी दोन पथके तयार करून शहरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपी निष्पन्न केले.

अवघ्या पाच तासाच्या आत सदर आरोपीची माहिती काढून आरोपी सुभाष अंबादास धुमाळ (रा.धनुभाई प्लॉट, परभणी) यास ताब्यात घेतले. त्याने इतर दोन आरोपींसोबत सदर गुन्हा केल्याचे कबूल केले. गुन्ह्यातील चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे, साईनाथ पूयड, व्यंकट कुसुमे, बी.टी.तूपसमुंदरे, विलास सातपुते, रवी जाधव, परसोडे, रंगनाथ दुधाटे, सचिन भदर्गे, जयश्री आव्हाड, हरिचंद्र खूपसे, दिलावर खान, सिद्धेश्वर चाटे, मधुकर ढवळे, राम पौळ, नामदेव दुबे, गायकवाड, निलेश परसोडे, हनुमान ढगे, निकाळजे, गणेश कौटकर, संतोष मोहोळे यांच्या पथकाने केली.

चोरीसाठी वापरलेले वाहन, शस्त्र ताब्यात

सदर गुन्ह्यात चोरीचा माल नेण्यासाठी आरोपींनी वापरलेले वाहन, चोरीस गेलेल्या सुकामेवा व घरफोडीसाठी आवश्यक असलेले लोखंडी टाँमी, लोखंडी पाईप, पकड, गजाळीची गळ, वायर, स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी धारधार पाते असलेले खंजीर असा एकूण तीन लाख ५७ हजार ३४८ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. आरोपी व मुद्देमाल यांना नानलपेठ ठाण्यात हजर करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीParbhani policeपरभणी पोलीसParbhani Policeपरभणी पोलीस