शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रक थेट रुळावर आला, चालकाच्या प्रसंगावधानाने १०० मीटर अंतरावर थांबली रेल्वे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 18:23 IST

सारवाडी - कोडी रेल्वे पटरीवरील घटना; ट्रक चालकाने केले पलायन

- प्रमोद साळवेगंगाखेड (जि.परभणी) : मुंबईहून नांदेडकडे निघालेली तपोवन एक्सप्रेस रेल्वे क्रं १७६१७ जालन्याच्या पुढे सारवाडी - कोडी शिवारात आली असता अचानक मालवाहतूक ट्रक क्रं (एमएच- २१ डी- ९२७५) रेल्वे पटरीवर येऊन थांबला. गोंधळलेल्या ट्रक चालकाने पलायन केले. रेल्वे चालकाने मात्र समयसूचकता व प्रसंगावधान दाखवत ट्रकपासून १०० मीटर अंतरावर तातडीचे ब्रेक लावल्याने रेल्वे अपघाताची मोठी दुर्घटना टळली. शुक्रवारी (ता.३१) रोजी दुपारी ३ वाजता ही घटना घडली. सुमारे ४० ते ४५ मिनिटे या प्रकारामुळे रेल्वे वाहतूक खोळंबली होती. दरम्यान ट्रक चालकाने पलायन केल्याची माहिती आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी, मुंबईहून नांदेडकडे निघालेली तपोवन एक्सप्रेस दुपारी ३ वाजता जालन्याच्या पुढे सारवाडी- कोडी शिवारात येताच समोर मालवाहतूक ट्रक एन रेल्वे पटरीवर येऊन थांबल्याचे रेल्वे चालकाच्या निदर्शनास आले. घटनेचे गांभीर्य ओळखून समयसुचकतेने प्रसंगावधान साधत रेल्वे चालकाने १०० मीटर अंतरावर ब्रेक केले. घाबरलेल्या ट्रक चालकाने तत्काळ पलायन केले.

दरम्यान, रेल्वे चालकाने मात्र परिस्थिती नियंत्रणात आणत रेल्वे अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देऊन उपस्थित प्रवाशांची मदत घेतली. संपूर्ण परिस्थिती निवळण्यासाठी सुमारे ४५ मिनिटे लागल्याची माहिती आहे. ट्रक चालकाची अक्षम्य चूक शेकडो रेल्वे प्रवाशांच्या जीवावर बेतली असती. मात्र, रेल्वे चालकाने दाखवलेल्या हिमतीने दुर्घटना टळल्याची प्रत्यक्षदर्शी प्रवासी, सपोउपनिरीक्षक प्रदीप हीरक यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली.

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघातparabhaniपरभणी