शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

महसूल सहायकाने आधी मागितले एक लाख, तडजोडीत स्वीकारली ५० हजाराची लाच

By राजन मगरुळकर | Updated: October 1, 2024 20:13 IST

समृद्धी महामार्गात संपादित झालेल्या शेतजमिनीचा मोबदला देण्यासाठी लाच घेतली; महसूल सहायकासह खासगी इसम अटकेत

परभणी : तक्रारदाराच्या समृद्धी महामार्गात संपादित झालेल्या शेतजमिनीचा मोबदला खात्यावर जमा करण्यासाठी व शेतातून गेलेल्या पाइपलाइनच्या नुकसान भरपाई कामासाठी गंगाखेड उपविभागीय अधिकारी कार्यालयातील महसूल सहायकाने एक लाखांच्या लाचेची मागणी खासगी इसमामार्फत केली होती. याप्रकरणी मंगळवारी पंचासमक्ष केलेल्या सापळा कारवाईदरम्यान आरोपी लोकसेवकाने ५० हजारांची लाच तक्रारदाराकडून स्वीकारली. ही कारवाई गंगाखेडला मंगळवारी करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अमोल बालाजी खेडकर (महसूल सहायक) आणि दादाराव मारोतीराव गडगिळे (खाजगी इसम) असे या प्रकरणातील आरोपी लोकसेवकांची नावे आहेत. तक्रारदारांचे चांगेफळ गावातील गट क्रमांक ६८ मधील शेतजमीन जालना-नांदेड समृद्धी महामार्गकरिता संपादित झाली आहे. तक्रारदार यांना जमिनीचा मोबदला मंजूर झाला असून त्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा झाली नाही. संपादित जमिनीतून जाणारे पाइपलाइनचे नुकसान भरपाईकरिता नोंद केली नाही. त्यामुळे तक्रारदारांचा पाठपुरावा सुरू होता. मंजूर संपादित शेतजमिनीचा मोबदला व पाइपलाइनचे नुकसानभरपाई कामासाठी महसूल सहायक अमोल खेडकर यांनी खासगी इसम दादाराव गडगिळे यांच्यामार्फत तक्रारदारांना गंगाखेड उपविभागीय अधिकारी कार्यालयात येण्याचा निरोप दिला. त्यावरून आरोपी लोकसेवक खेडकर यांनी प्रलंबित कामासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. त्यावेळी तक्रारदार यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी लाच दिली नाही. ३० सप्टेंबरला एसीबी परभणी कार्यालयात आरोपी लोकसेवक अमोल खेडकर व खासगी इसम दादाराव गडगिळे यांच्याविरुद्ध तक्रार दिली.

आधी मागितले एक लाख, स्वीकारले ५० हजारपंचासमक्ष ३० सप्टेंबरला केलेल्या लाच मागणी पडताळणी कारवाईमध्ये खासगी इसम दादाराव गडगिळे यांनी तक्रारदार यांचे शेतजमिनीचा मंजूर मोबदला बँक खात्यात टाकण्यासाठी आरोपी लोकसेवक अमोल खेडकर यांच्यासमक्ष एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती अमोल खेडकर यांनी कामासाठी ५० हजार लाच मागणी स्वीकारण्याची तयारी दर्शविली. मंगळवारी पंचासमक्ष केलेल्या सापळा कारवाईत आरोपी लोकसेवक अमोल खेडकर यांनी तक्रारदार यांच्याकडून ५० हजार लाच स्वीकारली. त्यास लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले. खासगी इसम दादाराव गडगिळे यांचा शोध घेऊन अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याप्रकरणी गंगाखेड ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक अशोक इप्पर यांच्या पथकाने केली.

टॅग्स :parabhaniपरभणीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग