शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

फ्लॅश लाइटमुळे चालकाचे नियंत्रण सुटले अन् ट्रॅक्टर-ट्रॉलीसह २० फूट नदीत कोसळले

By मारोती जुंबडे | Updated: January 9, 2024 19:25 IST

प्रत्यक्षदर्शींनी जखमी वाहनचालकाला पालम येथे उपचारासाठी रवाना केले

पालम  : शहरापासून जवळच असलेल्या पालम-लोहा रस्त्यावरील नदीच्या पुलावरून ट्रॅक्टर उलटून अपघात झाला. ही घटना मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. त्यात ट्रॅक्टरचालक जखमी झाला.

लोहा तालुक्यातील अंतेश्वर येथील शेतकरी छत्रपती पिराजी कराळे यांचा ट्रॅक्टर (एमएच२६ बीसी ०४८०) कारखान्याला ऊस पुरवठा करतो. मंगळवारी तो गंगाखेड येथे ऊस घेण्यासाठी अंतेश्वरकडे निघाला. दरम्यान, पालम शहरालगतच्या पुलावर आले असता समोरील वाहनाच्या लाईटच्या प्रकाशामध्ये वाहनचालकाला पुलाचा अंदाज आला नाही.

शिवाय, पुलाचे कठडे उभे न दिसल्याने ट्रॅक्टर थेट पुलावरून २० फूट नदीमध्ये कोसळून अपघात झाला. या अपघातामध्ये चालक तुकाराम रामदास कराळे (वय ३२, रा. अंतेश्वर)  जखमी झाला. प्रत्यक्षदर्शींनी वाहनचालकाला पालम येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी लोहा येथे पाठविले. येथील पुलाला कठडे नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

 

टॅग्स :parabhaniपरभणीAccidentअपघात