शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

रेल्वे रुळ ओढाताना ट्रॅक्टरचे हेड अंगावर कोसळून चालकाचा जागीच मृत्यू

By विजय पाटील | Updated: August 12, 2024 14:07 IST

सेलू ते सातोना दरम्यान हादगांव पावडे शिवारातील घटना, सहा महिन्यांपूर्वी वडिलांचे झाले होते निधन, आता मुलाचाही मृत्यू

सेलू (परभणी) : सहा महिन्यापूर्वी वडीलांचे ह्दयविकाराने निधन झाले या दुखातून कुटुंब कसेबसे सावरत असतांना सेलू ते सातोना दरम्यान हादगांव पावडे शिवारात रवीवारी रेल्वे रुळ ओढण्याच्या कामात ट्रॅक्टर अंगावर पडून मुलाचा अपघातीमृत्यू झाला. या घटनेने कुटुंबावर दुहेरी दुखाचा डोंगर कोसळला.सुरेश प्रल्हाद जाधव (३०, रा.वरफळ ता.परतुर ) असे मयताचे नांव आहे.

वरफळ येथील सुरेश प्रल्हाद जाधव हा चालक म्हणून सेलू ते सातोना दरम्यान ट्रॅक्टरने रूळ ओढण्याचे काम करीत होता.रविवारी हादगांव पावडे शिवारात काम करतांना ट्रॅक्टरचे हेड पलटी होऊन अंगावर पडल्याने सुरेश प्रल्हाद जाधव याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला.या घटनेने वरफळ गावावर शोककळा पसरली आहे. 

दरम्यान रेल्वे गँगमन बालाजी पवार यांनी घटनेची सेलू पोलीसांना माहिती दिली.पोउपनी प्रमोद देशमुख,पो.ना.माधव कांगणे,ईब्राहीम शेख यांनी घटनास्थळी पंचनामा केला.सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात शेवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. वाहन निष्काळजीपणे चालवून स्वतः मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात भा.न्या.स.कलम १०६ नुसार मयत सुरेश जाधव यांचेविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूparabhaniपरभणी