सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने स्वीकारली दहा हजाराची लाच 

By राजन मगरुळकर | Published: April 15, 2024 11:14 PM2024-04-15T23:14:46+5:302024-04-15T23:14:54+5:30

परभणी एसीबी पथकाची कारवाई

The Assistant Police Sub-Inspector accepted a bribe of ten thousand | सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने स्वीकारली दहा हजाराची लाच 

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने स्वीकारली दहा हजाराची लाच 

परभणी : तक्रारदार यांच्या भावजीच्या एमएलसी जवाबाचे केलेल्या कामाबद्दल नवा मोंढा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली व ही लाच रक्कम पडताळणी सापळा दरम्यान आरोपी लोकसेवकाने स्वीकारली. ही कारवाई सोमवारी सायंकाळी करण्यात आली. याप्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी, तक्रारदार यांचे भावजी यांना गंगाखेडला चार एप्रिलला झालेल्या मारहाणीमध्ये ते बेशुद्ध झाल्याने त्यांना परभणी येथील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारास दाखल केले होते.त्यावरून संबंधित डॉक्टरांनी पोलीस स्टेशन नवामोंढा येथे एमएलसी घेणे बाबत कळविले होते. तक्रारदार यांचे भावजी हे शुध्दीवर नसल्याने व त्यांचे तोंडाला क्लिप लावलेली असल्याने जबाब नोंदवता आला नाही. १२ एप्रिलला आलोसे संजय मुंढे हे नवामोंढा पोलीस ठाणे येथून जबाब घेणे करिता आले. तक्रारदार यांचे भावजीला बोलता येत नसल्याने त्यांनी लेखी तक्रार दिली असता आलोसे मुंढे यांनी लेखी तक्रार जमत नाही, असे म्हणून सदर घटनेचे प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार यांचा जबाब नोंदवला आणि तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली. आलोसे. मुंढे यांना लाचेची रक्कम दिली नाही तर ते पोलीस स्टेशन गंगाखेडला जबाब पाठवणार नाहीत. म्हणून त्यावेळी नाईलाजास्तव तक्रारदार यांचे भावजीच्या भावाने आलोसे मुंढे यांना पाच हजार रुपये दिले. त्यानंतर आलोसे मुंढे यांनी १५ एप्रिलला तक्रारदार यांना फोन करून म्हणाले की, मी तुमच्या भावजीच्या जबाब चांगला नोंदविला आहे. तुम्ही मला येऊन भेटा. तुम्हाला आणखीन पैसे द्यावे लागेल. असे म्हणून लाचेची मागणी करत असल्याची तक्रार एसीबी परभणीकडे सोमवारी प्राप्त झाली. सोमवारी केलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान आलोसे.

संजय मुंढे यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांना त्यांच्या भावजीच्या एमएलसी जबाबचे केलेल्या कामाबद्दल आणखी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यावरून केलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालय पोलीस चौकीमध्ये आलोसे संजय मुंढे यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडून दहा हजार रूपये लाचेची रक्कम स्विकारली आहे.आलोसे सपोउपनि. संजय मुंढे यांना लाचेच्या रक्कमेसह ताब्यात घेतले असून नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अशोक इप्पर, पोलीस निरीक्षक सदानंद वाघमारे, पोलीस कर्मचारी निलपत्रेवार,कदम,बेद्रे कदम, नरवाडे यांच्या पथकाने केली.

Web Title: The Assistant Police Sub-Inspector accepted a bribe of ten thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.