शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

‘येलदरी’चे दहा दरवाजे पुन्हा उघडले; मुसळधार पावसाने आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2021 14:31 IST

Yeldari Dam येलदरी धरण १०० टक्के भरल्याने प्रशासनाला पूर नियंत्रण करताना कसरत करावी लागत आहे.  

ठळक मुद्देपूर्णा प्रकल्पात पावसाची वार्षिक सरासरी ६५० ते ७५० मि.मी. एवढी आहे.यावर्षी धरण परिसरात १२०० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस

येलदरी (ता.जिंतूर) : जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणाच्या ( Yeladari Dam ) पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस ( Heavy Rain In Parabhani ) झाल्याने पूर्णा नदीला ( Purna River ) पूर आला असून, प्रकल्पात पाण्याची आवक वाढली आहे. परिणामी बुधवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास येलदरी धरणाचे सर्व म्हणजे १० दरवाजे उघडून २१ हजार १०० क्यूसेस पाणी पूर्णा नदीपात्रात सोडले जात आहे.

येलदरी धरण १०० टक्के भरल्याने प्रशासनाला पूर नियंत्रण करताना कसरत करावी लागत आहे.  मागील आठ दिवसांपासून धरणाचे दरवाजे कमी अधिक प्रमाणात सुरू करावे लागले. येलदरीतून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे धरणाखालील पूर्णा नदी दुथडी भरुन वाहत आहेत.पूर्णा प्रकल्पावर उभारलेले बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा, जिंतूर तालुक्यातील येलदरी व हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरण ही तिन्ही धरणे तुडुंब भरलेले असल्याने अतिरीक्त पाणी या तिन्ही धरणांमधून सोडावे लागत आहे.

कोरोना वाढल्याने मानवतमध्ये गर्दीच्या ठिकाणांवर दहा दिवस निर्बंध

पूर्णा प्रकल्पात पडणाऱ्या पावसाची वार्षिक सरासरी ६५० ते ७५० मि.मी. एवढी आहे. मात्र यावर्षी धरण परिसरात १२०० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. परिसरात पावसाची गंभीर स्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. सोयाबीन ,कापूस ,तूर, उडीद, मूग ही पिके उद्‌ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

वाण नदीत मित्रांसोबत पोहण्यास गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊस