शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

या शिक्षकाच्या हातात आहे कला; रंगीत खडूंच्या सहाय्याने बोर्डवरच रेखाटले शिवरायांचे लक्षवेधक चित्र 

By सुमेध उघडे | Updated: February 19, 2019 17:57 IST

शिवाजी महाराजांचे जयंतीनिमित्त बोर्डवर रेखाटलेले चित्र सध्या सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले आहे.

- सुमेध उघडे 

औरंगाबाद /परभणी : शिक्षक आणि शाळा आठवलं की समोर येतो तो वर्गातील काळा  फळा. या काळ्या फळ्यावर अंक आणि अक्षरांशिवाय क्वचितच दुसरे काही नजरेत पडते. मात्र पाथरी तालुक्यातील माळीवाड्याच्या जिल्हा परिषदच्या आंतरराष्ट्रीय शाळेत एक शिक्षक याच काळ्या फळ्यावर रंगीत खडूंच्या सहाय्याने लक्षवेधक चित्र रेखाटतात. पंकज बिरादार असे या शिक्षकाचे नाव आहे. मेहनत आणि कल्पकतेच्या सहाय्याने शिवाजी महाराजांचे जयंतीनिमित्त त्यांनी रेखाटलेले चित्र सध्या सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले आहे.

परभणी जिल्ह्यात पाथरी तालुक्यात भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा आहे. यात पंकज बिरादार मागील वर्षभरापासून कार्यरत आहेत. मुळचे उदगीर तालुक्यातील बिरादार यांना चित्रकलेची आवड आहे. मात्र त्यांनी याचे कुठेही शिक्षण घेतले नाही. शाळेत 'फलक लेखन' असा शिक्षकांच्या कार्याचा एक भाग असतो. यातूनच त्यांनी बोर्डवर रंगीत खडूंच्या सहाय्याने चित्र रेखाटन सुरु केले. विद्यार्थ्यांना दिनविशेष समजावून सांगण्यात त्यांच्या या चित्रांची मोठी मदत होत आहे. आकर्षक रंगसंगतीत रेखाटलेली ही चित्रे शिक्षकांच्या वर्तुळात चर्चेची ठरली. यातूनच त्यांची रेखाटने सोशल मीडियातून व्हायरल झाली. अंक आणि अक्षरांशिवाय काळ्या फळ्यावरची ही आकर्षक रेखाटने सध्या चर्चेची ठरत आहेत. 

पुण्यावरून मागवतात विशेष खडू रेखाटन करण्यासाठी लागणारी रंगीत खडू परभणी जिल्ह्यात उपलब्ध होत नाहीत. यामुळे बिरादार ही खडू पुण्यातून मागवतात. आजच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त त्यांनी याच खडूंच्या सहाय्याने शुभेच्छा चित्र रेखाटले आहे. हे चित्र  रेखाटण्यासाठी त्यांना अडीज तासाचा अवधी लागला. शिव जयंती असल्याने त्यांचे हे चित्र लागलीच व्हायरल झाले. यासोबतच त्यांनी नुकताच झालेला पुलवामा येथील दहशवादी हल्ला, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिन, महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री, सावित्रीबाई फुले, कल्पना चावला आदी विषयावरील सुरेख चित्रे रेखाटली आहेत. 

राज्यमंत्री  खोत झाले प्रभावित काही दिवसांपूर्वी कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शाळेस भेट दिली. यावेळी बिरादार यांनी त्यांच्या समक्षच केवळ १० मिनिटात खडूच्या सहाय्याने त्यांचे चित्र रेखाटले. यामुळे प्रभावित झालेल्या खोत यांनी त्यांचे कौतुक केले.

छंद म्हणून जोपसना

शाळेत 'फलक लेखन' या प्रकारातून मला रेखाटन करण्याचा छंद जडला. यातूनच रंगीत खडूंच्या सहाय्याने मी दिनविशेष वेगळ्या पध्दतीने रेखाटने सुरु केले. येथे येताच शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व सहकारी शिक्षकांनी मला सातत्याने प्रोत्साहन दिले. यामुळे माझ्या छंदाची जोपासना होतेच शिवाय विद्यार्थ्यांना एका वेगळ्या कलेची ओळखही होते. - पंकज बिरादार, प्राथमिक शिक्षक, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा 

टॅग्स :ShivjayantiशिवजयंतीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजzp schoolजिल्हा परिषद शाळाTeacherशिक्षक