परभणी : आगामी महापालिका निवडणुकीसाठी वॉर्डरचना करताना नैसर्गिक सीमा ओलांडू नयेत, तसेच एका वसाहतीचे तुकडे होणार नाहीत, याची काळजी घ्यावी, तसेच निवडणूक आयोगाच्या नियामांचे पालन करावे, अशी मागणी भाजपने केली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र निवडणूक आयोगाने सक्षम अधिकाऱ्यामार्फत प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे निर्देश आयुक्तांना दिले आहेत. हे काम सुरूही झाले आहे. हे काम करीत असताना आयोगाने दिलेल्या अटी व नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे डीपी रोड, नाला व एका कॉलनीचे विभाजन होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी भाजपची मागणी आहे. नगरपालिका असतानाही ‘एक वॉर्ड, एक सदस्य’ होता. तेव्हा या वेळेस प्रभागरचना करताना या सर्व बाबींची काळजी घ्यावी, अशी मागणी भाजपचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे, नगरसेवक मोकिंद खिल्लारे, मधुकर गव्हाणे, सुनील देशमुख, रितेश जैन आदींनी केली आहे.