शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सदाभाऊ खोत यांच्या गाडीसमोर टोमॅटो फेकून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केला निषेध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 16:00 IST

टोमॅटोलाही अत्यल्प भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे़

परभणी : दुष्काळी परिस्थितीमध्ये टोमॅटोला किरकोळ भाव मिळत असल्याने आणि शासनाच्या उपाययोजना ठप्प असल्याने बुधवारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीसमोर टोमॅटो फेकून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला़ शहरातील बसस्थानकाजवळील उड्डाणपूल भागात दुपारी साधारणत: २़४५ च्या सुमारास ही घटना घडली़ 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत बुधवारी परभणी येथे आले होते़ विद्यापीठातील हा समारंभ आटोपल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली़ या बैठकीनंतर खोत यांच्या वाहनांचा ताफा स्टेशन रोड, बसस्थानक मार्गाने पाथरीकडे निघाला़ यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, दिगांबर पवार, केशव आरमळ, भास्कर खटींग, मुंजाभाऊ लोढे, उस्मान पठाण आदींसह इतर कार्यकर्ते उड्डाणपुलाजवळ सुरुवातीपासूनच थांबले होते.

परभणी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून, रबीचा हंगाम वाया गेला आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर येणारा भाजीपाला पिकविला़ मात्र भाजीपाल्यालाही भाव मिळत नाही़ टोमॅटोलाही अत्यल्प भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे़ या शिवाय जिल्ह्यात दुष्काळी योजनांना सुरुवात झाली नाही़ या कारणांवरून कृषी राज्यमंत्री  आणि शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी कार्यकर्त्यांनी उड्डाणपुलालगत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या वाहनासमोर टोमॅटो फेकून रोष व्यक्त केला़ यावेळी पोलीस बंदोबस्तही होता़ परंतु, अचानक झालेल्या या प्रकारामुळे काहीसा गोंधळ उडाला आणि त्याच परिस्थिती खोत यांच्या वाहनांचा ताफा पुढे निघून गेला़

टॅग्स :agitationआंदोलनSadabhau Khotसदाभाउ खोत agricultureशेतीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना