शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
4
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
5
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
6
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
7
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
8
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
9
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
10
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
11
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
12
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
13
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
14
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
15
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
16
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
17
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
18
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
19
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
20
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोरीच्या प्रकरणात फौजदारासह एक पोलीस कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 14:28 IST

पाथरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हातील दोन वेगवेगळ्या प्रकरणात  पोलीस उपनिरीक्षक टोपाजी कोरके व पोलीस शिपाई रमेश पांडूरंग मुंढे यांचे निलंबन

ठळक मुद्दे जमानतीसाठी लाच घेतल्याचा आरोप पोलिस अधीक्षकांनी काढले आदेश

- विठ्ठल भिसे

पाथरी : पोलिस ठाण्यात  कर्तव्यावर असताना बेकायदेशीर कृत्य केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी  पाथरी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक टोपाजी कोरके यांच्यासह एका पोलीस कर्मचाऱ्यास सेवेतून निलंबित केल्याचे आदेश 2 डिसेंबर रोजी रात्री उशिरा  काढले आहेत.

पाथरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हातील दोन वेगवेगळ्या प्रकरणात  पोलीस उपनिरीक्षक टोपाजी कोरके व पोलीस शिपाई रमेश पांडूरंग मुंढे यांनी आरोपींना मदत करण्यासाठी लाचेची मागणी करून मदत केली.  तसेच एका प्रकरणात 50 हजाराची लाच स्वीकारली तर दुसऱ्या प्रकरणात  बाभळगाव बिटचा संबंध नसताना लाच न दिल्याने आरोपीस कोठडीत टाकले अशा तक्रारी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. याची चौकशी केल्यानंतर कर्तव्यात कसूर, बेशिस्त, बेजबाबदार, अनैतिक व लाचखोर वृत्तीचे वर्तन केल्याचे पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या निदर्शनास आले. यामुळे दोन्ही कर्मचाऱ्यांवर तडकाफडकी कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणात झाले निलंबन :पाथरी पोलिसात दाखल  ४११ / २०२०  गुन्हयामध्ये पोउपनिरीकक्षक  टोपाजी कोरके यांनी तक्रारदार आयुब खान वली महम्मद खान रा.फक्राबाद मोहल्ला , पाथरी व त्यांचे ईतर ५ नातेवाईक यांची सदर गुन्हात जमानत होण्याकरीता सहकार्य पाहिजे असल्यास प्रती ईसम रु .२०,००० / -प्रमाणे ६ ईसमांचे रु .१,२०,००० / - आपले मित्र अन्वर अन्सारी यांचे कडे आणून देण्याची मागणी केली. तडजोडी अंती आपले मित्र अन्वर अन्सारी यांचे मार्फत रु .५०,००० / - स्विकारले. यानंतर तक्रारदार यांना जमानत मिळण्यासाठी अडथळे कमी केले. लाचखोरीचे असे गैरकायदेशिर कृत्य करुन जनमानसात पोलीसांची प्रतिमा मलीन केलेली आहे, असा कसुर ठेवत सेवेतून निलंबीत केले आहे. 

तर दुसऱ्या एका प्रकरणात पोशि रमेश मुंढे यांनी  पाथरी पोलीस ठाण्यात दाखल एन.सी.क्र .२४ ९ / २०२० या गुन्हयामध्ये ज्ञानेश्वर दिलीपराव कोल्हे रा . उमरा हे दि .१ डिसेंबर  रोजी सकाळी ६ ते ८च्या दरम्यान स्वत : हुन पोस्टे.पाथरी येथे हजर झाले असता त्यांना दिवसभर पोस्टे.ला बसवुन ठेवुन सायंकाळी ७ वाजता जमानत मिळवुन देण्यासाठी तक्रारदार यांना प्रथम रु .१५,००० / ची मागणी केली तक्रारदार हे तयार झाल्याने त्यांची फॉर्मवर सही घेऊन उद्या सकाळी तहसील येथे जमानत करुन देतो म्हणुन म्हटले व नंतर काही वेळाने होमगार्ड केशव दौलतराव मुंढे यांचे मार्फत जमानत करण्यासाठी रु .३०,००० / - ची मागणी केली ' परंतु तक्रारदार हे रु .३०,००० / - एवढी रक्कम देण्यास तयार नसल्याने त्यांना परत अटक करुन रात्रभर पोलीस कोठडीत ठेवत बेकायदेशीर कृत्य केले .विशेष म्हणजे निलंबीत पोलिस कर्मचारी मुंढे यांना बाभळगांव बिट येथे कार्यरत नसतांनाही व सदर गुन्हयाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसतांना त्यांनी  होमगार्ड केशव दौलतराव मुंढे यांचे मार्फत तक्रारदार यांना रु .३०,००० / ची मागणी केली . यात लाचखोरीचे गैरकायदेशिर कृत्य करुन जनमानसात पोलीसांची प्रतिमा मलीन केलेली आहे असे आदेशात नमुद करत पोलीस अधिक्षक जयंत मीना यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १ ९ ५१ मधील कलम २५ अन्वये  प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन  आदेश प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून शासकीय सेवेतून निलंबीत केले आहे.

टॅग्स :suspensionनिलंबनparabhaniपरभणीParbhani policeपरभणी पोलीस