शहरं
Join us  
Trending Stories
1
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
2
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
3
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
5
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
6
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
7
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
8
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
9
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
10
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
11
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
12
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
14
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
15
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
16
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
17
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
18
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
19
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
20
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका

ऊस उत्पादकांचा तीन तास रास्ता रोको; दराचा निर्णय झाला अन् शेतकऱ्यांनी उधळला गुलाल

By मारोती जुंबडे | Updated: January 17, 2024 19:20 IST

राजू शेट्टी यांनी केले आंदोलनाचे नेतृत्व; कारखानदारांकडून २७०० रुपये भाव देण्याचे आश्वासन

परभणी: ऊसाला सरसकट प्रतिटन २७०० रुपये भाव मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली परभणी- गंगाखेड रस्त्यावरील शिंगणापूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. २ तास चाललेल्या या आंदोलनानंतर जिल्ह्यातील सात साखर कारखानदारांनी हा भाव देण्याचे जाहीर केले. त्यानंतर हा रास्ता रोको ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून मागे घेण्यात आला.

जिल्ह्यातील ऊसाला २७०० रुपये प्रति टन भाव देण्यात यावा, या मागणीसाठी मागील दोन महिन्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत. या आंदोलनाचा धसका घेऊन जिल्ह्यातील सात पैकी पाच कारखान्यांनी हा भाव देऊ असे जाहीर केले. परंतु, जिल्ह्यातील दोन कारखान्यांचे प्रशासन हे भाव देण्यास तयार नव्हते. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी परभणी- गंगाखेड रस्त्यावरील शिंगणापूर फाटा येथे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दुपारी १२ वाजता सुरू झालेले हे रास्ता रास्ता रोको आंदोलन दोन तास चालले. या आंदोलनादरम्यान त्या दोन साखर कारखान्याच्या प्रतिनिधींनी शेट्टी यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर बराच वेळ चाललेल्या चर्चा दरम्यान ऊसाला प्रतिटन २७०० रुपये भाव देण्याचे हमी यावेळी देण्यात आली. त्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांच्याकडून हे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. या आदोंलनात किशोर ढगे, दिपक लिपणे, रामप्रसाद गमे,गजानन तुरे, रामराजे महाडीक, प्रसाद गरुड, मुंजा लोडे, पंडित भोसले, तानाजी भोसले, रुपेश शिंदे, शेख चाँद, विकास भोपळे, गजानन दुगाने, माऊली शिंदे, मयुर वाघमारे, नागेश दुधाटे, सचिन शिंदे आदींसह कार्यकर्ते व परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अन् शेतकऱ्यांनी उधळला गुलालजिल्ह्यातील सातही साखर कारखान्यांनी उसाला प्रति टन २७०० भाव देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर दोन तास चाललेल्या आंदोलनाला यश आले. त्यानंतर उपस्थित ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून आंदोलनस्थळी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.

वाढीव ६४ कोटी रुपये मिळणारजिल्ह्यातील ऊसाला सात पैकी दोन कारखानदारांकडून २४०० ते २५०० प्रतिटन भाव देण्यात येत होता. त्यामुळे सातही कारखान्यांनी उसाला २७०० रुपये प्रति टनचा भाव द्यावा, यासाठी बुधवारी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला यश आल्यानंतर जिल्ह्यात यावर्षी जवळपास ३२ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप होणार आहे. या पोटी सुधारित भावाने जवळपास ६४ कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रSugar factoryसाखर कारखाने