शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शिकवणीविना 'एमपीएससी'त यश; परभणीची आंचल अग्रवाल कर निरीक्षक परीक्षेत राज्यात तिसरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 14:29 IST

एमपीएससीचा निकाल जाहीर; खेड्यातील मुलीचे २२ व्या वर्षी यशाला गवसणी

झरी (जि. परभणी) : प्रामाणिक प्रयत्न, आत्मविश्वास, सातत्य आणि कठोर परिश्रम घेण्याची तयारी असेल तर कुठलेही ध्यये गाठणे अशक्य नाही. हे परभणी तालुक्यातील झरी या खेडेगावातील आंचल अग्रवाल हिने दाखवून दिले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या कर निरीक्षक परीक्षेत महिला प्रवर्गातून राज्यात तृतीय क्रमांक पटकावून शिकवणीविना यश संपादन केले जाऊ शकते हे दाखवून दिले आहे.

अनेक पालक शालेय शिक्षणाबरोबरच खासगी शिकवणीवर भर देताना दिसतात. मग ते प्राथमिक असो की पदवीधर अशा विविध शैक्षणिक पातळ्यांवर पाल्यांच्या शिकवणीसाठी भरमसाट खर्च करतात. मात्र, शिक्षणाची आवड आणि जीवनात एक ध्येय घेऊन परिश्रम घेणाऱ्यांच्याच हाती यश मिळते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) नोव्हेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्र अराजपत्रित गट ब परीक्षा घेण्यात आली. एमपीएसीने२०९ पदांसाठी ही परीक्षा घेतली. १६ नोव्हेंबरला परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात महिला प्रवर्गातून परभणी जिल्ह्यातील झरी गावातील आंचल अग्रवाल हिने राज्यातून तिसरा क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे कुठलेही खासगी शिकवणी क्लासेस नसताना अवघ्या २२ व्या वर्षी महाराष्ट्र राज्य लोकसेवा स्पर्धा परीक्षेत पहिल्याच प्रयत्नामध्ये यश संपादन करत इतर विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

पहिल्याच प्रयत्नात मिळविले यशदहावी परीक्षेत ९५ टक्के गुण मिळविल्यानंतरही इतर शाखेत प्रवेश न घेता कला शाखा निवडून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. अभ्यासातील सातत्य कायम ठेवत कर निरीक्षक पदासाठी अर्ज केला आणि पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले. यासाठी तिला काका राजू अग्रवाल, वडील दत्तप्रसाद अग्रवाल यांचे मार्गदर्शन लाभले.

आयएएस होण्याचे स्वप्नमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेत यश मिळविले असले तरी एवढ्यावरच न थांबता केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेची तयारी करून जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न आहे, असे आंचल अग्रवाल हिने लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाparabhaniपरभणी