शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
3
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
4
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
5
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
6
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
7
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
8
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
9
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
10
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
11
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
12
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
13
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
14
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
16
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
17
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
18
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
19
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
20
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल

गोष्ट नाते जोडणा-या प्लंबरच्या प्रयत्नाची !; परभणीत अत्यवस्थ सापडलेल्या युवकाची झाली कुटुंबियांसोबत पुनर्भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 17:09 IST

शहरातील एका प्लंबरने दाखविलेल्या सर्तकतेमुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात बेवारस स्थितीत उपचार घेत असलेला अनोळखी युवकाला त्याचे कुटुंबिय पुन्हा भेटले आहे.

ठळक मुद्देहरवलेला मुलगा प्लंबरच्या सर्तकतेने पालकांना भेटलाउस्मानाबाद येथील युवक: परभणीत घेत होता उपचार

परभणी : शहरातील एका प्लंबरने दाखविलेल्या सर्तकतेमुळे आणि प्रयत्नांमुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात बेवारस स्थितीत उपचार घेत असलेला अनोळखी युवकाला त्याचे कुटुंबिय पुन्हा भेटले आहे. दत्ता विष्णू अंकुशे या मुलाचे नाव असून परभणीतील प्लंबर शेख मोहसीन शेख आयुब यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे अखेर पालकांची आणि हरवलेल्या मुलाची भेट झाली आहे.

येथील प्लंबर शेख मोहसीन शेख आयुब हे १३ डिसेंबर रोजी काही कामानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयात गेले होते. त्यावेळी रुग्णालयातील एका बेडवर अत्यवस्थ अवस्थेत आणि बेवारस स्थितीत एक युवक पडलेला दिसला. या युवकाची दाढी आणि केस वाढले होते. उत्सुकतेपोटी शेख मोहसीन यांनी येथील डॉक्टरांना या युवकाविषयी विचारपूस केली तेव्हा त्याला रुग्णालयात कोणी दाखल केले आणि हा युवक कोण आहे, याची माहिती उपलब्ध होत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे या युवकावर उपचार करतानाही अडचणी निर्माण होत होत्या. मोहसीन यांनी बेवारस अवस्थेतील युवकाला मदत करण्याची इच्छा डॉक्टरांकडे व्यक्त केली. डॉक्टरांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर मोहसीन यांनी स्वत: बेवारस अवस्थेतील युवकाची दाढी, कटींगही केली. त्याला स्वच्छ स्नान घातले. त्यानंतर डॉक्टरांनी केलेल्या उपचारानुसार औषधींचा खर्चही केला. हा युवक बरा झाल्यानंतर त्याचे फोटो काढून व्हॉटस्अ‍ॅपवर टाकले आणि हे फोटो उस्मानाबाद जिल्ह्यापर्यंत पोहचल्यानंतर येथील काही जणांनी या युवकांना ओळखले. ही माहिती युवकांच्या कुटुंबियांना देण्यात आली. 

२१ डिसेंबर रोजी या युवकाचे कुटुंबीय परभणीत दाखल झाले. त्याचे आई-वडिल आणि मोठी बहीण असे तिघे जण परभणीत पोहचले आणि हरवलेल्या दत्ताची त्यांनी भेट घेतली. हरवलेल्या दत्ताची पुन्हा भेट झाल्याने या कुटुंबियांना गहिवरुन आले. प्लंबर शेख मोहसीन शेख आयुब यांनी केलेल्या प्रयत्नामुळे अत्यवस्थेत हरवलेला मुलाची आणि आई- वडिलांची भेट झाली. यावेळी दत्ता अंकुशे याला निरोप देताना शेख मोहसीन शेख आयुब यांच्यासहयेथील पाणी वीज बचत गटाचे अध्यक्ष रणजीत कारेगावकर, बंडू मगर, विष्णू म्हेत्रे यांची उपस्थिती होती.

फिट्सचा आजार असल्याने हरवला होता दत्तापरभणी येथे उपचार घेणार्‍या या मुलाचे नाव दत्ता विष्णू अंकुशे असे  असल्याची माहिती त्याच्या आई-वडिलांच्या भेटीनंतर सर्वांना समजली. दत्ता हा २२ वर्षांचा युवक असून फिटस् आल्यानंतर तो अचानक गायब होतो. यापूर्वी देखील तो निघून गेला होता. मात्र परभणीत दत्ताला योग्यवेळी उपचार मिळाले आणि त्याच्या आई-वडिलांची भेट झाली. 

टॅग्स :parabhaniपरभणी