शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

गटशिक्षणाधिकारी कार्यालयास चोरून वीज देणे मुख्याध्यापिकेच्या अंगलट; दंडासह बिल भरावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 18:42 IST

सेलू येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे ४५ हजार रुपये वीज बिलाची थकबाकी असल्याने सहा महिन्यांपूर्वी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

देवगावफाटा (परभणी): गटशिक्षणाधिकारी कार्यालयास चोरून वीज देणे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या मुख्याध्यापिकेच्या चांगलेच अंगलट आले आहे. वीज चोरी प्रकरणात मुख्याध्यापिका एस.एस.वेडे या दोषी आढळल्या आहेत.  त्यांच्यावर महावितरणने कारवाई केली असून २४ हजार १६० दंड व २९ हजार ५० रूपये वीज बिल भरावे लागणार आहेत.

सेलू येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे ४५ हजार रुपये वीज बिलाची थकबाकी असल्याने सहा महिन्यांपूर्वी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. मात्र, कार्यालय सहा महिन्यांपासून शेजारील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातून अनधिकृतरीत्या जोडणी करून वीज वापरत असल्याचे १८ मे रोजी महावितरणच्या कनिष्ठ अभियंता पि.आर.थोरात यांच्या निदर्शनास आले. थोरात यांनी पंचनामा करून वीज चोरीसाठीचे वायर जप्त केले.याप्रकरणाची उपकार्यकारी अभियंता डि.टी.तेलंगधरे यांनी गंभीर दखल घेतली.

त्यानंतर विद्यालयाच्या वीज मिटरची पाहणी करून कनिष्ठ अभियंता थोरात यांनी अहवाल कार्यालयास सादर केला. चौकशीत गटशिक्षणाधिकारी कार्यालयास अनधिकृतपणे वीज देण्यात कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस. एस. वेडे या दोषी असल्याचे सिद्ध झाले. त्यांच्यावर वीजचोरी कलम १२६ अंतर्गत कारवाई करण्यात आली. यानुसार त्यांना २४ हजार १६० रूपये दंड आणि २९ हजार ५० रूपये वीज बिल भरावे लागणार आहे. 

दरम्यान, ही रक्कम वसतिगृहाच्या अनुदानातून कशी भरता येईल ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रभारी गटशिक्षणाधिकारी डी. डी. साबळे यांनी कार्यालयाचे ४५ हजार रूपये वीज बील नियमीत भरले असते तर मुख्याध्यापीका एस.एस.वेडे यांच्यावर ही वेळ आली नसती अशी चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणparabhaniपरभणी