शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

परभणी शहरातील स्थिती : सार्वजनिक शौचालयांना घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 23:56 IST

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत साधारणत: दीड वर्षापूर्वी लाखो रुपयांचा खर्च करून शहरात उभारलेल्या सार्वजनिक शौचालयांपैकी बहुतांश शौचालये बंद पडल्याने स्वच्छता अभियानाचा बोजवारा उडाला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत साधारणत: दीड वर्षापूर्वी लाखो रुपयांचा खर्च करून शहरात उभारलेल्या सार्वजनिक शौचालयांपैकी बहुतांश शौचालये बंद पडल्याने स्वच्छता अभियानाचा बोजवारा उडाला आहे़नागरी स्वच्छता अभियानांतर्गत परभणी शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी वर्षभरापूर्वी मोठा गाजावाजा करीत उपक्रम राबविण्यात आले़ शहरातील सार्वजनिक स्थळे हागणदारीमुक्त करीत विविध भागात सुमारे ६३ सार्वजनिक शौचलयांची उभारणी करण्यात आली़ प्रत्येक शौचालयांवर लाखो रुपयांचा खर्चही करण्यात आला़ शहरातील विविध भागांमध्ये सार्वजनिक शौचालय उभारल्याने शहरवासियांची गैरसोय दूर होईल, असे वाटत होते़ परंतु, काही दिवसांतच यातील अनेक शौचालये बंद पडली़ शौचालयांच्या परिसरात सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती़या सुरक्षारक्षकांचे नियमित वेतन होत नसल्याने शौचालयाच्या देखभालीचा प्रश्न निर्माण झाला़ एक-एक करीत शौचालयांची बंद होण्याची मालिकाच सुरू झाली़ रविवारी शहरातील सार्वजनिक शौचालयांची पाहणी केली असता, १३ सार्वजनिक शौचालये बंद अवस्थेत असल्याचे दिसून आले़ यापैकी काही शौचालयांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे़ त्यामुळे मनपाने सार्वजनिक शौचालयांवर केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेला असून, नागरिकांची गैरसोयही ‘जैसे थै’ असल्याचे दिसत आहे़महानगरपालिकेने बंद असलेले सार्वजनिक शौचालय पूर्ववत सुरू करावीत, अशी मागणी होत आहे़ही शौचालये बंदशहरात रविवारी केलेल्या पाहणीत फेरोज टॉकीज परिसर, निरज हॉटेल, जिंतूर रोडवरील आयटीआयसमोरील शौचालय, जिल्हा परिषदेसमोरील शौचालय, राजगोपालाचारी उद्यान, एमआयडीसी परिसरातील प्रबुद्ध नगर, खानापूर भागातील सारंगनगर, एसटी वर्कशॉपच्या पाठीमागील शौचालय, गंगाखेड रोडवरील कुक्कुटपालन परिसरातील शौचालय, लोहगाव रोड आणि खंडोबा बाजार परिसरातील शौचालय बंद असल्याचे दिसून आले़शौचालयांना पाण्याचा फटका४शहरात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, मनपाने उभारलेल्या सार्वजनिक शौचालय परिसरात पाणी उपलब्ध नसल्याने ही शौचालये बंद असल्याचे निदर्शनास आले आहे़४विशेष म्हणजे, शौचालयांची उभारणी करतानाच त्या ठिकाणी बोअरही घेण्यात आला होता; परंतु, उन्हाळ्यात पाणीच आटल्याने शौचालये बंद पडली आहेत़ तर काही भागात शौचालयांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, ते शौचालय बंद असल्याचे दिसून आले़शौचालयांची दुरवस्था४शहरातील काही शौचालयांची दुरवस्था झाली आहे़ या शौचालयातील फरशी, नळ्याच्या तोट्या गायब झाल्या आहेत़ तर शौचालय परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी असल्याचे दिसत आहे़४खानापूर भागात स्मशानभूमी परिसरात सिमेंटच्या विटा वापरून बांधलेले शौचालय बुडापासूनच उखडले आहे़ सध्या हे शौचालय बंद असल्याचे दिसून आले़या भागातील शौचालये सुरूरविवारी केलेल्या पाहणीत पाथरी रोड, प्रशासकीय इमारत परिसर, शनिवार बाजार, शासकीय रुग्णालय परिसर, एम.आय.डी.सी. परिसर, खानापूर फाटा परिसरातील एक, धाररोड, वांगी रोड, भीमनगर आदी भागातील सार्वजनिक शौचालये सुरू असल्याचे दिसून आले.बांधकामापासूनच शौचालय बंदशहरातील जिंतूर रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या समोर महापालिकेने उभारलेले सार्वजनिक शौचालय उद्घाटनापासूनच बंद आहे़ या शौचालयाचा वापरही झालेला नाही़ त्यामुळे शौचालयावर केलेला खर्च नागरिकांना सुविधा पुरवू शकला नाही़४तसेच राजगोपालाचारी उद्यानातही शौचालयांची उभारणी करण्यात आली़ परंतु, हे शौचालयेही बंद अवस्थेत असल्याचे दिसून आले़ नेहरू गार्डन भागातील शौचालय सुरू आहे़ परंतु, त्या ठिकाणी पाण्याची सुविधा नाही़ त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीParbhani Municipal Corporationपरभणी महानगरपालिका