शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरी पट्ट्यात १७ हजार हेक्टरवर ऊस लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 18:55 IST

पाथरी तालुक्याला जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून व गोदावरी नदीपात्रातून बंधाऱ्यामध्ये मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने सिंचन क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे.

ठळक मुद्देपाथरी तालुक्यात तीन ते चार वर्षे दुष्काळी स्थिती होती यावर्षी पहिल्यांदाच १६ हजार ८१६ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे.

- विठ्ठल भिसे 

पाथरी (परभणी ) : पाथरी तालुक्याला जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून व गोदावरी नदीपात्रातून बंधाऱ्यामध्ये मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने सिंचन क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. काही वर्षानंतर पहिल्यांदाच १६ हजार ८१६ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे.

पाथरी तालुक्यात तीन ते चार वर्षे दुष्काळी स्थिती होती. अत्यंत कमी पाऊस होत असल्याने बागायतीचे क्षेत्र कमी झाले होते. काही वर्षापूर्वी पाथरी तालुक्यातील गोदावरीचा भाग उसाचा पट्टा म्हणून ओळखला जात होता. दोन खाजगी साखर कारखाने असूनही पाण्याची सुविधा अपुरी पडत असल्याने उसाचे क्षेत्रही घटले होते. यावर्षी मात्र परिस्थिती बदलली आहे. पाथरी तालुक्यातून जाणाऱ्या जायकवाडीच्या डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात येत आहे. तसेच गोदावरी नदीपात्रावरील बंधाऱ्यामध्येही मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे. तालुक्यात पाणी मुबलक उपलब्ध झाल्याने शेतकरीही आता कोरडवाहू पिके सोडून बागायतीची पिके घेत आहेत.

नगदी पीक म्हणून उसाकडे पाहिले जाते. अनेक वर्षानंतर पाथरी तालुक्यातील शेतकरी ऊस लागवडीकडे वळले आहेत. पाथरी येथील रेणुका शुगर व लिंबा येथील योगेश्वरी शुगर्स या दोन खाजगी कारखानाक्षेत्रात उसाचे क्षेत्र वाढले आहे. पाथरी कारखाना कार्यक्षेत्रात ७ हजार ८४० हेक्टर तर लिंबा कारखाना कार्र्यक्षेत्रात ८ हजार ९७६ हेक्टर, अशा एकूण १६ हजार ८१६ हेक्टरवर ऊस लागवड झाल्याची नोंदणी झाली आहे. गतवर्षी पाथरीच्या रेणुका शुगर्सने १ लाख ६० हजार मे. टन तर लिंबा येथील योगेश्वरी शुगर्सने २ लाख मे.टन उसाचे गाळप केले होते. 

पूर्ण क्षमतेने गाळप होण्याची आवश्यकतापाथरी तालुक्यात यावर्षी प्रथमच १६ हजार ८१६ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे. कारखान्याच्या गाळप क्षमतेपेक्षा ३५ टक्के अधिक ही लागवड आहे. परभणी जिल्ह्यात पाथरी येथील रेणुका शुगर्स, लिंबा येथील योगेश्वरी शुगर्स, गंगाखेड, पूर्णा, त्रिधारा असे पाच कारखाने आहेत. गतवर्षी जिल्हाबाहेरील ७ ते ८ कारखाने शेतकऱ्यांची मनधरणी करीत ऊस घेऊन जात होते. यावर्षी सगळीकडेच उसाचे क्षेत्र वाढले आहे. बीड जिल्ह्यातही अधिक उसाची लागवड झाली आहे. त्यामुळे तेथील कारखाने  ऊस गाळपासाठी नेतील, याची शाश्वती उरली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील कारखाने वेळेत पूर्ण क्षमतेने गाळप करू शकल्यास अतिरिक्त उसाचा प्रश्नही मिटण्यास मदत होणार आहे. 

टॅग्स :godavariगोदावरीSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी