शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

परभणी जिल्ह्यासाठी सहा लाख मे़ टन चाऱ्याचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 20:51 IST

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती  निर्माण झाली तरी चारा टंचाई उद्भवल्यास प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे़ 

परभणी : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उद्भवणारी चारा टंचाई लक्षात घेऊन जिल्हा पशुसंवर्धन विभागाने जून अखेरपर्यंत पुरेल एवढ्या ६ लाख मे़ टन चाऱ्याचे नियोजन केले आहे़ त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती  निर्माण झाली तरी चारा टंचाई उद्भवल्यास प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे़ 

यावर्षी परतीचा पाऊस झाला नसल्याने संपूर्ण जिल्हा दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहे़ पाणीटंचाई बरोबरच चाऱ्याचाही प्रश्न या काळात निर्माण होवू शकतो़ खरीप हंगामामध्ये झालेल्या पेरणीवर काही चारा प्रशासनाकडे उपलब्ध आहे़ तसेच रबी हंगामातही थोड्याफार प्रमाणात चाऱ्याची उपलब्धता होणार असून, चारा टंचाई उद्भवू नये, यासाठी प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे़ येथील जिल्हा पशुसंवर्धन विभागातून मिळालेल्या माहितीनुसार ३० आॅक्टोबरपर्यंत उपलब्ध असलेला चाऱ्यावर पुढील नियोजन करण्यात आले आहे़

परभणी जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातून ३ लाख ९५ हजार ८४५ मे़ टन चाऱ्याची उपलब्धता झाली आहे़ तसेच ३० आॅक्टोबरपर्यंत २७ हजार २३१ मे़ टन चारा रबी हंगामात झालेल्या पेरणीतून उपलब्ध होईल, अशी शक्यता आहे़ याशिवाय वनक्षेत्र, चटई क्षेत्र, कुरण, बांधावरील क्षेत्र, पडिक जमीन या भागातील चाऱ्याचा आढावा घेतला तेव्हा १ लाख ३०० मे़ टन चारा उपलब्ध आहे़ तसेच जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मक्याची पेरणी झाली असून, त्यातूनही २० हजार ६४० मे़ टन चारा मिळेल़

महाराष्ट्र शासनाने जिल्हा नियोजन विशेष समितीच्या माध्यमातून राबविलेल्या योजनेतून ३१ हजार ७४३ म़े टन, राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून १७ हजार ५०० मे़टन चारा उपलब्ध होईल़ त्यामुळे या सर्व घटकांमधून परभणी जिल्ह्यात ५ लाख ९३ हजार २९३ मे़ टन चाऱ्याची उपलब्धता होवू शकते़ हा चारा जून अखेरपर्यंत पुरू शकतो़ विशेष म्हणजे ३० आॅक्टोबरपर्यंतचा हा अहवाल असून, त्यावेळी रबी हंगामात केवळ ३ टक्के पेरणी झाली होती़ या पेरणीच्या आधारे २७ हजार २३१ मे़ टन चाऱ्याचे नियोजन करण्यात आले होते़ सद्यस्थितीला रबी हंगामातील पेरणी १३ टक्क्यांवर पोहचली. रबीतूनही चारा उपलब्ध होणार आहे़ 

दररोज लागतो २५४६ मे़ टन चारापरभणी जिल्ह्यामध्ये उपलब्ध असलेल्या पशुधनाची संख्या लक्षात घेता राज्य शासनाने दुष्काळी परिस्थितीत मोठ्या जनावरांसाठी दररोज ६ किलो, लहान जनावरांसाठी ३ किलो आणि शेळ्या-मेंढ्यासाठी ०़६ किलो चारा प्रतिदिन लागतो, असे निष्कर्ष काढले आहेत़ या निष्कर्षानुसार परभणी जिल्ह्यात जनावरांसाठी दररोज २५४६ मे़ टन चाऱ्याची आवश्यकता आहे़ तर महिन्याकाठी ७६ लाख ३९३ मे़टन चारा जिल्ह्याला लागतो़

जिल्ह्यात साडेतीन लाख जनावरेपशूसंवर्धन विभागाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार जिल्ह्यामध्ये ३ लाख ६२ हजार ७९३ मोठी जनावरे आहेत़ तर ९१ हजार ३१० लहान जनावरे आहेत़ चाऱ्यासाठी पशूसंवर्धन विभाग घटक स्वरुपात जनावरांची नोंदणी करते़ त्यानुसार लहान जनावरांमध्ये दोन घटक गृहित धरले जातात़ त्यामुळे लहान जनावरांची घटक संख्या ४५ हजार ६५५ एवढी असून, शेळ्या-मेंढ्या १ लाख ५९ हजार ५५९ एवढ्या असून, त्यांची घटक संख्या १५ हजार ९५६ एवढी आहे़ जिल्ह्यामध्ये ४ लाख ४२ हजार ४०४ पशूधन घटक उपलब्ध असून, या घटकांनुसार चाऱ्याचे नियोजन करण्यात येते़ 

चाऱ्यासाठी २५ लाखांची मागणीभविष्यात जिल्ह्यामध्ये चारा कमी पडू नये, यासाठी चारा उत्पादनाचाही उपक्रम राबविण्यात येणार असून, चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना प्रशासनामार्फत बियाणांचे वाटप करण्यासाठी पूनर्विनियोजन अंतर्गत २५ लाख रुपयांची मागणी नोंदविण्यात आली आहे़ 

१ कोटी ८८ लाखांची नोंदविली मागणीजिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता भविष्यामध्ये चाऱ्याची टंचाई वाढू शकते़ त्यामुळे जनावरांना चारा उपलब्ध करून देणे गरजेचे होईल़ पशू संवर्धन विभागामार्फत गावनिहाय आराखडे तयार करण्याचे काम सुरू आहे़ भविष्यात चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला तर चारा छावण्या उभाराव्या लागतील़ त्यासाठी शासनाकडे १ कोटी ८८ लाख रुपयांची मागणी नोंदविली आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा पशू संवर्धन उपायुक्त डॉ़ संजीव खोडवे यांनी दिली़ 

टॅग्स :droughtदुष्काळparabhaniपरभणीParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणी