शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी एकाचवेळी ५३ गावांत उपोषण, सरकारची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 12:39 IST

मराठा आरक्षणासाठी मानवत तालुक्यातील सकल मराठा समाजाची आक्रमक भूमिका 

- सत्यशील धबडगे मानवत : मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने ८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता तालुक्यातील ५३ गावात एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाला सुरवात करण्यात आली. या आंदोलनात समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले असून आंदोलकांनी राज्यसरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली.

मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यात यावा व मराठा आरक्षण देण्यासाठी तात्काळ विशेष विधानसभा अधिवेशन बोलविण्यात यावे या मागणीसाठी ८ सप्टेंबर रोजी तालुक्यातील ५३ गावात सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच या वेळेत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या नुसार आज सकाळी आंदोलनाला सुरवात करण्यात आली.

गावोगावी ग्रामपंचायत कार्यालय, मंदीर आदी ठिकाणी समाज बांधव उपोषणाला बसले आहेत. नागरजवळा, मानोली या गावी राज्यसरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. रत्नापुर येथे आंदोलकानी अर्धनग्न आंदोलन सुरू केले आहे.आंदोलनात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने तालुक्यातील शाळेत अघोषित सुट्टी असल्याचे चित्र निर्माण झाले. एकाच वेळी ५३ गावात आंदोलन केले जाणार असल्याने परिस्थिती हाताळण्यात प्रशासनाचा कस लागणार आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणparabhaniपरभणी