शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! खेळ म्हणून मुलांनी मोबाईलच्या बॅटरीला जोडले डिटोनेटर; स्फोटात दोघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 15:15 IST

कुतुहूल म्हणून या मुलांनी आपल्याजवळ असलेल्या मोबाईलची बॅटरी काढून त्याचे कनेक्शन डिटोनेटर लावले.

जिंतूर : शेतातील आखाड्यावर राहणाऱ्या दोन शाळकरी विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या बॅटरीला डिटोनेटरच्या काड्याचे कनेक्शन लावल्याने मोठा स्फोट झाला. यात स्फोटात दोन्ही मुले गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत माहिती अशी की,  जिंतूर शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या जालना रोडवरील शेख सलीम यांच्या आखाड्यावर शाहिद पठाण  सालगडी म्हणून राहतात. ह्यांचा मुलगा अमन शाहिदखा पठाण (१३)  व शेख असलम शेख अब्दुल (१०) हे दोघे  व जालना रोडवर असलेल्या वाशिंग सेंटरजवळ खेळत होती. याच वाशिंग सेंटरच्या बाजूला असलेल्या एका गोदामाजवळ त्यांना ब्लास्टिंगसाठी जिलेटिनच्या कांड्या असलेला  डिटोनेटरचा  संच पडलेला दिसला. 

कुतुहूल म्हणून या मुलांनी आपल्याजवळ असलेल्या मोबाईलची बॅटरी काढून त्याचे कनेक्शन डिटोनेटर लावले. त्यामुळे अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटात अमन शाहिदखा पठाण  यांच्या डाव्या हाताची पाचही बोटे  व उजवा डोळा निकामी झाला. तर शेख असलम शेख अब्दुल याच्या डाव्या डोळ्यावरील भागाला खोलवर इजा झाली. स्फोटाचा आवाज ऐकून नागरिकांनी तिकडे धाव घेतली. गंभीर जखमी मुलांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना परभणी येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणीBlastस्फोट