शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत जरांगेंची एन्ट्री अन् मंत्र्यांशी थेट संवाद! शक्तिपीठबाबत ५ मार्चला मोठा निर्णय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 19:22 IST

शेतकऱ्यांच्या भावना समजून शक्तीपीठाबाबत निर्णय घ्यावा; मनोज जरांगेंचे आवाहन

परभणी : शक्तीपीठ महामार्गाबाबत सरकारने शेतकऱ्यांवर बळाचा वापर न करता त्यांच्या भावना व भूमिका समजून घेतल्यानंतरच निर्णय घ्यावा, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी परभणीत केले.

परभणी तालुक्यातील सहजपूर जवळा येथील शेतकरी गेल्या चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी दखल न घेतल्याने बुधवारी जरांगे पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. त्यावेळी ५ मार्च रोजी मुंबईत शक्तीपीठ महामार्गाबाबत बैठक घेण्यात येईल व शेतकऱ्यांच्या मनासारखा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याचे सांगण्यात आले. यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषणकर्त्यांना पाणी देऊन उपोषण मागे घेण्यास सांगितले. एकाही शेतकऱ्याने मोजणीस सहमती दिलेली नसून प्रशासनाने बळाचा वापर करू नये, शेतकऱ्यांशी संवाद साधावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी खासदार संजय जाधव, महापौर सय्यद इकबाल, किशोर रनेर, डॉ. निलेश दळवे, बालाजी मोहिते यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

वडिलोपार्जित जमिनी हिसकावून घेऊ नयेत – खासदार संजय जाधवशक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित जमिनी बळजबरीने हिसकावून घेऊ नयेत, अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी केली आहे. सहजपूर जवळा येथे महसूल व पोलीस प्रशासनाने शेतकऱ्यांवर बळाचा वापर करून त्यांना दैठणा व ताडकळस पोलीस ठाण्यात कोंडून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकरी जमिनी द्यायला तयार नसताना हा रस्ता नेमका शेतकऱ्यांसाठी आहे की उद्योगपतींसाठी, हे सरकारने स्पष्ट करावे, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Jarange's Entry in Parbhani: Direct Talk, Big Decision on Shaktipeeth?

Web Summary : Manoj Jarange Patil urged a farmer-friendly decision on the Shaktipeeth highway. After meeting with protesting farmers, he spoke with a minister, securing a meeting on March 5th to address their concerns, urging authorities to avoid force.
टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलShaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गparabhaniपरभणी