शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत शक्तीपीठ महामार्ग मोजणीला विरोध चिरडण्याचा प्रयत्न; मध्यरात्री कार्यकर्त्यांची धरपकड

By मारोती जुंबडे | Updated: February 20, 2026 07:56 IST

परभणीत 'मिडनाईट' थरार! 'शक्तीपीठ' मोजणीपूर्वी पोलिसांची दडपशाही; आंदोलकांना घरातून उचलले

परभणी: प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला जिल्ह्यातून तीव्र विरोध होत असतानाच, प्रशासनाने २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मोजणीपूर्वी मोठी कारवाई केली आहे. गुरुवारी मध्यरात्री आणि शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी परभणी, गंगाखेड आणि दैठणा परिसरातून तब्बल दहा जणांना ताब्यात घेतल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून शेतकरी वर्गातून संतापाची लाट उसळली आहे.

पहाटेच्या वेळी घराचे दरवाजे ठोठावलेशक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी करण्यासाठी पोलिसांनी 'प्रतिबंधात्मक कारवाई'च्या नावाखाली धरपकड सुरू केली आहे. शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास परभणी शहरातील शिवलिंग बोधने आणि अमोल जाधव यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन नानलपेठ पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तसेच, कोल्हापूरहून परतणाऱ्या किशोर ढगे व त्यांच्या सहकाऱ्यांना गंगाखेडच्या परळी नाक्यावर रात्री १० वाजताच रोखून ताब्यात घेण्यात आले.

गावोगावी पोलिसांच्या धाडीदुसरीकडे, दैठणा पोलीस आणि जिल्हा पथकाने उमरी येथील प्रसाद गोरे यांच्यासह चौघांना पहाटे पाच वाजता ताब्यात घेतले. या सर्व कारवाया मोजणीच्या दिवशी कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी केल्याचा दावा पोलीस प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना अशा प्रकारे मध्यरात्री घरातून उचलल्याने पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

मोजणी की रणकंदन?आज २० फेब्रुवारी रोजी सहजपूर आणि जवळा शिवारात मोजणी होणार आहे. मोजणीपूर्वीच एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या धरपकडीमुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. शासन एकीकडे 'शेतकरी हिता'चे दावे करत असताना दुसरीकडे मात्र पोलिसी बळाचा वापर करून जमिनी हिसकावून घेत असल्याचा आरोप आंदोलक करत आहेत. आजची मोजणी शांततेत पार पडणार की जिल्ह्यात संघर्षाची ठिणगी पडणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shaktipeeth Highway opposition crushed in Parbhani; activists arrested midnight.

Web Summary : Parbhani police arrested ten activists opposing Shaktipeeth Highway land measurement. Raids occurred pre-measurement, sparking farmer outrage. Authorities claim action prevents unrest; critics question police tactics as measurement proceeds.
टॅग्स :Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गparabhaniपरभणीFarmerशेतकरी