परभणी : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात पुनर्याचिका दाखल करून अथवा केंद्र सरकारकडे आपल्या स्तरावरून पाठपुरावा करून समाजाला दिलेले आरक्षण पूर्ववत मिळवून द्यावे, अशी मागणी संभाजी सेनेने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
देवेंद्र फडणवीस हे बुधवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर, शहराध्यक्ष अरुण पवार, सतीश जाधव, विजय जाधव आदींनी त्यांची भेट घेऊन मराठा आरक्षण प्रश्नी त्यांना निवेदन सादर केले. मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबरोबरच कोविड रुग्णांसंदर्भातही फडणवीस यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. कोविडचे उपचार घेणाऱ्या सर्व रुग्णांना महात्मा फुले जीवनदायी योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी संभाजी सेनेने केली आहे.
मराठा आरक्षणाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा, या मागणीचे निवेदन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देताना संभाजी सेनेचे रामेश्वर शिंदे, विठ्ठल तळेकर, अरुण पवार, सतीश जाधव, विजय जाधव. photo 02pph19