शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
2
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
3
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
4
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
5
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
6
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
7
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
8
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
9
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
10
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
11
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
12
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
13
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
14
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
15
Health Tips: शरीरावर असलेले लाल मोस कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
16
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
17
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
18
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
19
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
20
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका

जागा एक, उमेदवारी अख्ख्या गावाची; मराठा आरक्षणासाठी ग्रामपंचायत निवडणुकीत गांधीगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 15:22 IST

मराठा आरक्षणासाठी चाटे पिंपळगावच्या ग्रामस्थांनी घेतला निर्णय

- विठ्ठल भिसेपाथरी (परभणी): मराठा आरक्षण  मुद्दा दिवसेंदिवस कळीचा बनत चालला आहे.आरक्षणासाठी आता गाव पातळीवर एकत्र बसून निर्णय घेतले जात आहेत. मराठा आरक्षण समर्थनासाठी चाटे पिंपळगाव गावाने अनोखा निर्णय घेत ग्रामपंचायतच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी अख्खे गाव मैदानात उतरविण्याचे ठरवले आहे.शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.  गावातील जवळपास 300 महिलांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कागदपत्रे जुळविण्यात येत आहे. येथील ग्रामपंचायतच्या एका जागेच्या पोट निवडणुकीसाठी (सर्वसाधारण महिला)अख्खे गाव उमेदवारी अर्ज भरत गांधीगिरी करत असल्याने हा मुद्दा चांगलाच चर्चेचा ठरत आहे. 

जालना जिल्ह्यातील अंतरवाली येथील मराठा आरक्षण संदर्भात झालेल्या सभेनंतर आता आरक्षण मुद्दा गाव पातळीवर चांगलाच चर्चेला जाऊ लागला आहे. तालुक्यातील काही गावांमध्ये पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय ही घेण्यात आला तसे बोर्ड अनेक गावात झळकू लागले आहेत. आता मराठा आरक्षण संदर्भात  पाथरी तालुक्यातील चाटे पिंपळगाव येथील ग्रामस्थांनी ही वेगळा निर्णय घेतला आहे. चाटे पिंपळगाव येथील ग्रामपंचायतची एका जागेची पोट निवडणूक आहे. प्रभाग क्रमांक दोन मधील सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी ही निवडणूक होत आहे. उद्या शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. एक जागा आणि अख्खा गाव मैदानात. या निवडणुकीत चित्र दिसत आहे गावात याबाबत बैठक घेण्यात येऊन गावातील महिलांनी एकत्र येत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे निर्णय झाले.

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दिनांक 19 ऑक्टोबर रोजी सोळा उमेदवारी अर्ज दाखल झाले. शुक्रवारी शेवटच्या दिवशी किती अर्ज येतात याकडे लक्ष लागले आहे. जर गावातील सर्व महिलांनी उमेदवारी अर्ज भरले तर निवडणूक घेण्यासाठी पेच निर्णम झाला आहे.चाटे पिंपळगाव मध्ये 998 मतदार आहेत प्रभाग 2 मध्ये 270 मतदार आहेत. प्रभाग 2 मधील रिक्त झालेल्या सर्वसाधारण  महिला  जागेवर आता ही निवडणूक होत आहे ,

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणparabhaniपरभणीgram panchayatग्राम पंचायत