परभणी : जिल्ह्यात ५ वी ते ८ वीच्या शाळांना २७ जानेवारीपासून सुरुवात झाली असली तरी शाळतील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या कोरोनाच्या अनुषंगाने होणाऱ्या तपासणीचा नियमित अहवाल शिक्षण विभागाने तालुका स्तरावरून मागविला नाही. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनीही पाठवला नसल्याची बाब समोर आली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरी संसगर्ग कमी झालेला नाही. दररोज जिल्ह्यातील विविध भागात रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे. असे असताना प्रशासकीय पातळीवर याबाबत दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. शासनाने शाळांमधील शिक्षकांच्या कोरोना तपासणीचा दररोज ऑनलाईन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. असे असतानाता या आदेशाची जिल्ह्यात अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. शिवाय किती शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली, याचीही माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाकडे नाही.
२७ जानेवारीपासून ५ वी ते ७ वी चे सुरू झाले अस;न आत्ता नियमित उपस्थितीमध्ये वाढ होत आहे. शाळा स्तरावर संमतीपत्र देऊन उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची दररोज तपासणी केली जाते व नोंद ठेवली जाते. पंचायत समीतीला दररोज विद्यार्थी उपस्थिती अहवाल कळविला जातो.
बी.यु.शिराळ,
मुख्याध्यापक, प्रा.शा.चिकलठाणा बु.
५ वी ते ७ वी चे वर्ग अनलाँक प्रक्रियेनंतर २७ जानेवारी पासुन सुरू झाले असून शाळा स्तरावर संमतीपत्र देऊन उपस्थित राहणारे प्रत्येक विद्यार्थ्यांची दररोज तपासणी केली जाते. व पंचायत समितीने मागविलेल्याप्रमाणे दररोज उउपस्थिती अहवाल कळविला जातो.
रमेश शिलोडे,
मुख्याध्यापक, प्रा.शा.बोरकीनी
जिल्ह्यातील सर्व शाळा सुरु झाल्या आहेत. विद्यार्थी नियमित शाळेत येत आहेत. वरिष्ठ कार्यालयाकडून माहिती मागविण्यात आली नाही. वरिष्ठांनी माहिती मागितल्यानंतर ती उपलब्ध करून देण्यात येते. शिक्षकांच्या कोरोना चाचणींचा अहवाल तालुकास्तरावर आहे.
-सूचेता पाटेकर, शिक्षणाधिकारी