शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत सरपंचांनी अडवली गटविकास अधिकार्‍याची गाडी; स्वाक्षरी करण्यास करीत होते टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 15:19 IST

ब्राह्मणगाव येथील शासकीय कामकाजाच्या एमबीवर सही करण्यास टाळाटाळ करणार्‍या गटविकास अधिकार्‍यांची गाडी अडवून सरपंचांनी त्यांना जाब विचारला. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. रस्त्यातच बाचाबाचीही झाली. त्यानंतर गटविकास अधिकार्‍यांनी कक्षात जावून सही केल्याने प्रकरण निवळले.

ठळक मुद्देपरभणी तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील शाळेच्या संरक्षण भिंतीचे काम १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून मंजूर झाले आहे. या कामाच्या निविदाही निघाल्या असून एमबी रेकॉर्ड तयार करण्यात आले. या फाईलवर गटविकास अधिकार्‍यांची स्वाक्षरी लागते. ब्राह्मणगावचे सरपंच गजानन तुरे आणि संतोष काळदाते यांनी करडखेलकर यांच्याकडे अनेक वेळा चकरा मारल्या. मात्र ते स्वाक्षरी करीत नसल्याने काम थांबले होते. 

परभणी : तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील शासकीय कामकाजाच्या एमबीवर सही करण्यास टाळाटाळ करणार्‍या गटविकास अधिकार्‍यांची गाडी अडवून सरपंच यांनी त्यांना जाब विचारला. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. रस्त्यातच बाचाबाचीही झाली. त्यानंतर गटविकास अधिकार्‍यांनी कक्षात जावून सही केल्याने प्रकरण निवळले.

परभणी तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील शाळेच्या संरक्षण भिंतीचे काम १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून मंजूर झाले आहे. या कामाच्या निविदाही निघाल्या असून एमबी रेकॉर्ड तयार करण्यात आले. या फाईलवर गटविकास अधिकार्‍यांची स्वाक्षरी लागते. येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम.व्ही. करडखेलकर यांच्याकडे स्वाक्षरीसाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आला. ब्राह्मणगावचे सरपंच गजानन तुरे आणि संतोष काळदाते यांनी करडखेलकर यांच्याकडे अनेक वेळा चकरा मारल्या. मात्र ते स्वाक्षरी करीत नसल्याने काम थांबले होते. 

शनिवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास गजानन तुरे आणि संतोष काळदाते दोघेही गटविकास अधिकारी करडखेलकर यांच्या कक्षात आले. मात्र यावेळीही करडखेलकर यांनी स्वाक्षरी केली नाही. त्यामुळे संतप्त झालेले तुरे आणि काळदाते हे कक्षाबाहेर येऊन रस्त्यावर थांबले. कामकाज अटोपून करडखेलकर चारचाकी गाडीने निघाले तेव्हा रस्त्यातच त्यांची गाडी अडविण्यात आली. यावेळी तुरे आणि करडखेलकर यांच्यात बाचाबाची झाली. या प्रकारामुळे बघ्यांची गर्दीही झाली होती. जोपर्यंत स्वाक्षरी होत नाही, तोपर्यंत गाडी पुढे नेऊ देणार नाही, असा पवित्रा घेतल्यानंतर करडखेलकर यांनी दोघांनाही परत आपल्या कक्षात बोलावले आणि फाईलवर स्वाक्षरी केली. त्यामुळे प्रकरण निवळले. 

दरम्यान, करडखेलकर यांची गाडी अडविल्याची माहिती समजल्यानंतर तालुक्यातील अनेक सरपंच आणि पंचायत समिती सदस्य करडखेलकर यांच्या कक्षात दाखल झाले. यावेळी करडखेलकर यांच्या विषयी सर्वांनीच संताप व्यक्त केला. अधिकारी सह्या करीत नसल्याने विकासकामे थांबली आहेत. ग्रामस्थांना तोंड देताना आम्हाला नाकी-नऊ येते, अशी भावना व्यक्त करीत करडखेलकर यांच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली. यावेळी पंचायत समिती सदस्य भरत कच्छवे, टाकळी बोबडेचे सरपंच सचिन बोबडे आदींची उपस्थिती होती

टॅग्स :sarpanchसरपंचparabhaniपरभणी