शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वाळू तस्कराचा महसूल पथकावर धारदार शस्त्राने हल्ला, प्रसंगावधान राखत कर्मचाऱ्याने केला प्रतिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 12:11 IST

तब्बल दोन तासानंतर पोलीस आल्यानंतर तस्कराला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.   

- विठ्ठल भिसे

पाथरी ( परभणी ) : महसूल विभागाच्या पथकाच्या छापा टाकला असता ट्रॅक्टर पळवून नेत वाळू तस्कराने पथकावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची थरारक घटना आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास तालुक्यातील मंजरथ येथे घडली. यावेळी प्रसंगावधान राखून पथकातील एका कर्मचाऱ्याने प्रतिकार करत वाळू तस्कराला पडल्याने अनर्थ टळला. तब्बल दोन तासानंतर पोलीस आल्यानंतर तस्कराला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.   

गोदावरी नदीच्या पात्रात सध्या पाणी असलेले तरीही तरफेच्या सहाय्याने वाळू तस्करी होत आहे. तालुक्यातील मंजरथ शिवारात हा प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. यावरून तहसीलदार सुमन मोरे, मंडळ अधिकारी शिवाजी  भरकड यांच्या पथकाने पहाटे 5 वाजता मंजरथ येथील गोदावरीच्या पात्रात छापा टाकला. 

यावेळी पथकाला वाळूने भरलेला ट्रॅक्टर दिसून आला. यावेळी तहसीलदार सुमन मोरे यांनी चालकाला ट्रॅक्टर थांबविण्यास सांगितले. ट्रॅक्टर मालक संदीप सोळंके याने वाळू रस्त्यावर टाकत चालकासह तेथून पळ काढला. हा प्रकार होत असताना महसूल पथकाने तस्करांना ताब्यात घेण्यासाठी ट्रॅक्टरच्या दिशेने धाव घेतली. यावेळी वाळू तस्कर संदीप सोळंके हा हातात धारदार शस्त्र घेऊन पथकावर धावून जात दहशत निर्माण केली. 

वाळू तस्कराच्या हातातील धारदार शस्त्र पाहून थकातील कर्मचारी काहीवेळी थबकले. दरम्यान, प्रसंगावधान राखत पथकातील एका कर्मचार्‍याने तस्कराच्या हातातील शस्त्र हिसकावून घेत त्याला पकडून ठेवले. तहसीलदारांनी तत्काळ पोलिसांना पाचारण केले. तब्बल दोन तास तस्कराला पकडून ठेवण्यात आले. घटनास्थळी पोलिस येताच तस्कराला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीsandवाळू