शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मंजुरीच्या प्रतीक्षेत वाळूघाट; राज्यस्तरीय पर्यावरण समितीच्या होकारानंतरच पुढील प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 20:29 IST

त्रुटींची पूर्तता करून जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयाने नव्याने हे प्रस्ताव  आॅनलाइन पोर्टलवर सादर केले आहेत.

ठळक मुद्दे२४ जुलै रोजी राज्यस्तरीय पर्यावरण समितीची बैठक होणार आहे. नऊ प्रकरणांच्या काढल्या होत्या त्रुटी

परभणी : जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेसंदर्भात राज्यस्तरीय पर्यावरण समितीची मंजुरी आवश्यक असल्याने या समितीच्या निर्णयाकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.

दोन वर्षांपासून जिल्ह्यात वाळू घाटांचा लिलाव झालेला नाही. त्यामुळे वाळूची टंचाई निर्माण झाली असून बांधकाम व्यवसाय अडचणीत सापडला आहे. त्यामुळे वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेकडे या व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे. यावर्षी जिल्हा प्रशासनाने ३० वाळू घाटांचे लिलाव करण्याचे प्रस्ताव शासनाकडे सादर केले होते. त्यानंतर या प्रस्तावांच्या संदर्भाने जनसुनावणीही पूर्ण झाली आहे. सुनावणीनंतर सादर केलेल्या प्रस्तावांवर नऊ प्रकारच्या त्रुटी काढल्या होत्या. या त्रुटींची पूर्तता करून जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयाने नव्याने हे प्रस्ताव  आॅनलाइन पोर्टलवर सादर केले आहेत. २४ जुलै रोजी राज्यस्तरीय पर्यावरण समितीची बैठक होणार आहे.

या बैठकीत परभणीसह चंद्रपूर, जालना आणि उस्मानाबाद या चारही जिल्ह्यांतील प्रस्ताव या बैठकीमध्ये चर्चेला घेतले जाणार आहेत. त्यामुळे राज्यस्तरीय पर्यावरण समितीच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. या राज्यस्तरीय पर्यावरण समितीने वाळू घाटांच्या प्रस्तावांना मंजुरी दिल्यानंतर जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेस सुरुवात करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. असे असले तरी या सर्व प्रक्रियेला सप्टेंबर महिना उजाडण्याची शक्यता प्रशासकीय अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे खुल्या बाजारपेठेतील वाळू उपलब्ध होण्यासाठी नागरिकांना आणखी दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे नव्याने करण्यात येणारी बांधकामे ठप्प झाली आहेत.

नऊ प्रकरणांच्या काढल्या होत्या त्रुटीजिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी सादर केलेल्या वाळू घाटांच्या प्रस्तावामध्ये विविध प्रकारच्या ९ त्रुटी काढल्या होत्या. सर्वेक्षण अहवाल, घाटातील खोदकामाचे कॅल्क्युलेशन या तांत्रिक बाबींचा त्यात अंतर्भाव होता. या सर्व त्रुटी पूर्ण करून नव्याने प्रस्ताव आॅनलाइन अपलोड करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी विद्या खरवडकर यांनी दिली. वाळू घाटांची किंमत २९ कोटींच्या घरात जिल्ह्यातील ३० वाळू घाटांचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. त्यामध्ये गोदावरी नदीवर १८, दुधना नदीवर ५ आणि पूर्णा नदीवरील ७ वाळू घाटांचा समावेश आहे. साधारणत: २९ कोटी ९५ लाख रुपये किमतीचे हे प्रस्ताव असून, प्रत्यक्ष लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या महसुलातही भर पडणार आहे.

जिल्ह्यातील वाळू घाटांच्या प्रस्तावांच्या त्रुटींची पूर्तता करून ते आॅनलाईन सादर करण्यात आले आहेत. राज्यस्तरीय पर्यावरण समितीची मंजुरी मिळाल्यानंतर राज्यस्तरीय पर्यावरण आघात मूल्यांकन प्राधिकरणाची मंजुरी या प्रस्तावांना घ्यावी लागणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष लिलाव प्रक्रिया राबविता येईल.- विद्या खरवडकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी 

टॅग्स :sandवाळूparabhaniपरभणीParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणी