शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
2
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
3
Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले
4
बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी
5
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
6
वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर उतरला.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच समोर आला भन्नाट VIDEO
7
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
8
तीन सरकारी बस एकमेकांवर धडकल्या, ४० हून अधिक प्रवासी जखमी, अनेकांची प्रकृती चिंताजनक  
9
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
10
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
11
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
12
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
13
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
14
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
15
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
16
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
17
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
18
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
19
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
20
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...

परभणी वळण रस्त्यासाठी ३९.५५ कोटी रुपयांची आवश्यकता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 21:05 IST

परभणी शहराजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या वळण रस्त्याला ८४़४५ हेक्टर जमीन संपादित करावयाची असून, यासाठी ३९ कोटी ५५ लाख २४ हजार ३१९ रुपयांची आवश्यता असल्याचा प्रारुप अंदाज जिल्ह्याच्या भूसंपादन विभागाने काढला आहे़

परभणी : परभणी शहराजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या वळण रस्त्याला ८४़४५ हेक्टर जमीन संपादित करावयाची असून, यासाठी ३९ कोटी ५५ लाख २४ हजार ३१९ रुपयांची आवश्यता असल्याचा प्रारुप अंदाज जिल्ह्याच्या भूसंपादन विभागाने काढला आहे़ त्यामुळे आता हा प्रस्ताव अंतीम करून प्रत्यक्ष भूसंपादनालाच  सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़ 

कल्याण-निर्मल हा २२२ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग परभणी शहरातून नांदेडकडे जातो़ शहरामध्ये वाढलेली वसाहत, अरुंद रस्ते आणि त्यावर वाढती वाहतूक लक्षात घेऊन या रस्त्याला शहराबाहेरून वळण रस्ता काढण्याचे निश्चित करण्यात आले़ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या वळण रस्त्याचा आराखडा तयार केला असून, राजपत्रात हा आराखडा प्रसिद्धही झाला आहे़ १४़५ किमी अंतराचा हा वळण रस्ता असून, परभणी, धर्मापुरी, वांगी, असोला आणि पारवा या पाच गावांच्या शिवारातून हा रस्ता जाणार आहे़ महामार्ग प्राधिकरणाने तयार केलेल्या आराखड्यानुसार ८४़४५३९ हेक्टर जमीन रस्त्यासाठी संपादित करावी लागणार आहे़ 

महामार्ग प्राधिकरणाचे काम संपले असून, जमीन संपादनाची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागामार्फत केली जाणार आहे़ त्यासाठी भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ़संजय कुंडेटकर यांनी आठ दिवसांपासून जमीन संपादनाच्या प्रक्रियेला गती दिली़ या रस्त्यासाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करावयाची आहे, त्या जमिनीचे मूल्यांकन करणे, खातेदारांची यादी तयार करणे आणि जमिनीचे क्षेत्र मोजून द्यावयाच्या मोबदल्याची प्रारुप रक्कम तयार करण्यात आली आहे़ 

पाचही गावांमधील शेतकरी खातेदारनिहाय यादी तयार झाली असून, जिल्हा प्रशासनाला आता २५७ खातेदारांच्या ८४़४५ हेक्टर जमीन संपादनासाठी ३९ कोटी ५५ लाख २४ हजार ३१९ रुपयांची आवश्यकता लागेल, असा प्रारुप आराखडा तयार करण्यात आला आहे़ त्यामुळे या प्रारुप आराखड्याला अंतीम करून शेतकऱ्यांच्या जमिनी प्रत्यक्ष संपादित करण्याची कार्यवाही करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, या जमिनीचे अंतिम निवाडे निश्चित झाल्यानंतर जमीन संपादन केले जाईल. त्यानंतरच बाह्य वळण रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे़ 

गावनिहाय आवश्यक असलेली रक्कमबाह्य वळण रस्त्यासाठी ५ गावांची जमीन संपादित करावयाची असून, त्यात परभणी शहर परिसरातील सर्वाधिक ४२़१५ हेक्टर जमिनीचा समावेश आहे़ एकूण ५६ शेतकऱ्यांची ही जमीन असून, त्यासाठी १८ कोटी २२ लाख ४५ हजार ६४१ रुपये मावेजापोटी लागणार आहेत़ पारवा शिवारातील १़७६ हेक्टर जमिनीसाठी आठ खातेदार असून, ६९ लाख ५० हजार २०० रुपयांची आवश्यक आहे़ वांगी शिवारातील ५९ शेतकऱ्यांची १५़८९ हेक्टर जमीन घेण्यासाठी ५ कोटी ४४ लाख ८० हजार ५८३ रुपये, असोला शिवारातील ४९ शेतकऱ्यांची १३़९१ हेक्टर जमिनीसाठी ६ कोटी ४० लाख ६५ हजार ५२२ रुपये आणि धर्मापुरी शिवारातील ८५ शेतकऱ्यांची १०़७४३९ हेक्टर जमीन संपादित करण्यासाठी सर्वसाधारणपणे ५८ कोटी ७७ लाख ८२ हजार ३७३ रुपयांची आवश्यकता लागणार आहे़  

दिवसरात्र काम सुरूपरभणी येथील भूसंपादन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बाह्य वळण रस्त्याच्या भूसंपादनाचा प्रारुप निवाडा तयार करण्यासाठी आठवडाभरापासून दिवस-रात्र काम केले़ प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीचे क्षेत्र निश्चत करणे, त्या जमिनीचे मूल्य काढून हा निवाडा तयार करण्यात आला़ उपजिल्हाधिकारी डॉ़ संजय कुंडेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली अव्वल कारकून वर्षा महामुनी, जे़डी़ वाघमारे, लिपिक कैलास मठपती, रोहित जैस्वाल यांनी हे काम पूर्ण केले़ 

रक्कमेत वाढ होईल बाह्य वळण रस्त्यासाठी प्रारुप निवाडा तयार करण्यात आला आहे़ या निवाड्यामध्ये संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीवरील विहीर, बोअर, झाडे, घरे, बांधकाम आणि इतर तत्सम मूल्यांकनाची रक्कम गृहित धरली नाही़ त्यामुळे अंतीम निवाडा करताना ही रक्कम समाविष्ट होणार असून, प्रारुप निवाड्यातील रकमेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे - डॉ. संजय कुंडेटकर, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन

टॅग्स :highwayमहामार्गparabhaniपरभणीMONEYपैसाState Governmentराज्य सरकार