शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

चारचाकीने दुचाकीस धडक देत सोनारास २ लाखाला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 17:18 IST

एका चोरट्यास पकडण्यात यश

ठळक मुद्देपूर्णा ह्यातनगर रस्त्यावरील घटना

पूर्णा : ह्यातनगर येथून सुहागणकडे दुकान बंद करून येत असताना मारोती कार ने धडक मागून धडक देऊन व डोळ्यात मिरचीपूड टाकून सोनाराला लुटण्याची घटना दि. 8 सप्टेंबर रोजी सांय 6 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत चोरट्याने दोन लाखाचा ऐवज लंपास केला पोलीस व नागरिकांच्या  सतर्कतेमुळे काही वेळातच ह्यातनगर येथे गाडीसह एका चोरट्यास पकडण्यात यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुहागण (ता पूर्णा) येथील गोविंद विश्वनाथ भोसले व भाऊ हनुमान भोसले हे दोघे रविवारी सांय दररोज प्रमाणे आपले दुकान बंद करून दुचाकीवरून आपल्या गावाकडे निघाले. यावेळी एका चारचाकीने ( क्र MH21-C-2591 ) त्यांचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर जाताच चारचाकीने दुचाकीस पाठीमागून धडक दिली. यामुळे दोघेही खाली पडले. यानंतर चाराचाकीतील एकाने गोविंद यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली व त्यांच्याकडील २ लाख 21 रु. किंमतीचा ऐवज लंपास केला. घटनेच्या काही वेळातच नागरिक व पोलिसांच्या सतर्कतेमुळे गुन्ह्यात वापरलेली गाडी व एका चोरट्याला पकडण्यात यश आले असल्याची माहिती पोनि सुभाष राठोड यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणीArrestअटकPoliceपोलिस