शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाचा फटका; कापसाच्या वाती अन् सोयाबीनची माती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 19:04 IST

Return rain hits Parabhani : परतीच्या पावसाने नद्या-नाल्यांना पूर आला होता. यामुळेही जिल्ह्यात पिकांची अतोनात हानी झाली.

ठळक मुद्देरबी पेरणीसाठी अडचणीपुराचे पाणी शेतात शिरल्याने हानी

परभणी : परतीच्या पावसाने परभणी जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचा कापूस तुटलेला होता. या फुटलेल्या कापसाच्या अक्षरशः वाती झाल्या आहेत. तसेच काढून ठेवलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. 

परतीच्या पावसाने नद्या-नाल्यांना पूर आला होता. यामुळेही जिल्ह्यात पिकांची अतोनात हानी झाली. मागील पंधरा दिवसापूर्वी परभणीसह जिल्ह्यात  पाऊस धो-धो बरसला.  या पावसामुळे जिल्ह्यातील ४६ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे अद्यापही संपूर्ण पंचनामे झाले नाहीत, तोच आता परतीच्या पावसाने  धुमाकूळ घातला आहे. या पावसाने कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः उघडीप दिल्यानंतर कापूस मोठ्या प्रमाणात फुटला होता. काही शेतकऱ्यांनी कापसाची वेचणी केली असली तरी बहुतांश शेतकऱ्यांची कापसाची वेचणी राहिली होती. या पावसाने फुटलेल्या कापसाच्या वाती झाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. सोयाबीनचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून ठेवले आहे. अनेकांची काढणी सुरू आहे. मात्र परतीच्या पावसाने सोयाबीन पूर्णतः भिजली आहे. पाथरी, सेलू, मानवत, पूर्णा, परभणीसह अन्य तालुक्यातील नदी-नाल्यांना पाणी आले होते. सर्वच ठिकाणच्या नद्या तुडुंब वाहत आहेत. नद्यांना आलेल्या पुरामुळे जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

पुराचे पाणी शेतात शिरल्याने हानीनदीकाठच्या शेतशिवारात पुराचे पाणी पिकांमध्ये साचून राहिल्याने पिके पिवळी पडली आहेत. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट होणार आहे. तसेच सोयाबीनला डाग पडल्याने भावही अपेक्षेप्रमाणे मिळत नाही. त्यामुळे शेतकरी हैराण आहेत.

रब्बी अडचणीत खरिपाच्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हाती काहीच पडले नाही. त्यामुळे रब्बीची पेरणी कशी करावी? हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस