शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
2
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
3
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
4
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
5
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
6
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
7
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
8
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
9
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
10
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
11
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
12
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
13
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
14
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
15
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
16
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
17
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
18
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
19
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
20
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली

येलदरी जलाशयाच्या परिसरात आढळला दुर्मिळ छोटा चोर कावळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:16 IST

विजय चोरडिया जिंतूर : समुद्र काठावर आढळणारा छोटा चोर कावळा तौक्तेच्या तडाख्यातून वाचण्यासाठी येलदरी धरणाच्या परिसरात सुरक्षित ठिकाणी भटकंती ...

विजय चोरडिया

जिंतूर : समुद्र काठावर आढळणारा छोटा चोर कावळा तौक्तेच्या तडाख्यातून वाचण्यासाठी येलदरी धरणाच्या परिसरात सुरक्षित ठिकाणी भटकंती करताना आढळून आला. या पक्ष्याची नोंद पक्षीमित्र गणेश कुरा यांनी २१ मे रोजी घेतली आहे. मराठवाड्यात पहिल्यांदाच हा कावळा आढळल्याचे समजते.

येलदरी धरणाच्या जलाशयात हवेत उडत असताना नेहमीपेक्षा हा वेगळा पक्षी पक्षी निरीक्षकांना दिसला. ई-बर्डच्या नोंदीनुसार भारतात या पक्ष्याच्या खूप कमी नोंदी आहेत. मराठवाडयातील ही पहिलीच नोंद आहे. पक्षीमित्र, पक्षी अभ्यासकांसाठी खूप महत्त्वाची नोंद झाल्याने आनंदाचे वातावरण आहे. तौक्ते चक्रीवादळाच्या तडख्यामुळे सुरक्षित ठिकाणी येलदरी धरणाच्या ठिकाणी आला असावा, असे पक्षीमित्रांनी सांगितले. या पक्षाचे मराठी नाव ‘छोटा चोर कावळा’ असून, फ्रीगाटे बर्ड कुटुंबातील फ्रेगेटिडाईच्या कुळातील हा समुद्री पक्षी आहे. सुमारे ७५ सेमी (३० इंच) लांबीची, ही फ्रिगेटबर्डची सर्वात लहान प्रजाती आहे. हा पक्षी भारतीय आणि प्रशांत महासागराच्या तसेच ब्राझीलच्या अटलांटिक किनाऱ्‍यावरील उष्ण कटिबंधीय वातावरणात वास्तव्यास असतो.

छोटा चोर कावळा एक हलका अंगभूत समुद्री पक्षी आहे. ज्यात तपकिरी- काळा पिसारा, लांब अरुंद पंख आणि खोलवर काटेरी शेपटी असते. नरला एक लाल रंगाची सामान्य पिशवी असते आणि जोडीदारास आकर्षित करण्यासाठी तो त्यास फुगवितो. मादी नरापेक्षा किंचित मोठी आहे. फ्रिगेट बर्ड्स समुद्राच्या पृष्ठभागावरून उडणारे मासे खातात. नरांच्या वरच्या पंखांवर फिकट गुलाबी पट्टीदेखील असते. मादीच्या डोळ्याभोवती एक लाल रंगाचे वलयही असते. किशोर आणि अपरिपक्व पक्ष्यांना ओळखणे अधिक कठीण आहे. फ्रिगेट पक्षी उडण्यासाठी तयार झालेले असावेत. ते क्वचितच पोहतात आणि कमी चालत असतात. हे पक्षी झाडांमध्ये घरटे बांधतात. झाडे आणि झुडुपांभोवती सुरक्षित ठिकाणी पिलांचे संगोपन करतात. ते वजनाने अतिशय हलके असतात.

मराठवाड्यातील पहिलीच नोंद

२१ मे रोजी सकाळी येलदरी धरणाच्या जलाशयात हवेत उडत असताना नेहमीपेक्षा वेगळा पक्षी दिसला. या पक्षाचे त्वरित फोटो घेतले. त्याची अधिक माहिती तपासली असता, भारतात या पक्ष्याच्या ई-बर्डनुसार खूप कमी नोंदी आहेत. मराठवाडयातील ही पहिलीच नोंद असल्याचे गणेश कुरा यांनी सांगितले.

पक्षीमित्रांसाठी पर्वणी

महाराष्ट्रात या समुद्र पक्ष्याच्या ५ ते ६ नोंदी आहेत. तौक्ते वादळापासून स्वतःचा बचाव करण्यासठी येलदरी जलाशयाच्या आवारात आला असावा. पक्षीमित्रांसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे. येलदरी धरण परिसरात नेहमीच नवनवीन पक्षी येत असल्याने पक्षीमित्रांसाठी ही पर्वणी ठरत आहे.

अनिल उरटवाड, पक्षीमित्र