शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चक्क तीस लाख रुपयांच्या रेल्वे रूळाची चोरी; मुख्य आरोपी निघाला रेल्वेतीलच अभियंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 19:37 IST

रेल्वे रूळ चोरी प्रकरणात तपासासाठी तीन पथके स्थापन; एक आरोपी ताब्यात

परभणी : गंगाखेड स्थानकाजवळील वडगाव निळा येथील तीस लाख रुपयांच्या रेल्वे रूळ चोरीप्रकरणी परभणी आरपीएफ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात या चोरीच्या तपासासाठी तीन पथके तैनात केली आहेत.

२३ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या या प्रकरणात एका आरोपीला २१ फेब्रुवारीला आरपीएफ पथकाने ताब्यात घेतले तर मुख्य आरोपी अभियंता हैदराबादमध्ये उपचार घेत असून त्याचा ताबा मिळविण्याचे प्रयत्न आरपीएफ पोलिसांचे सुरू आहेत. यामुळे अजून फरार चार ते पाच आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागात विविध स्थानकांच्या दरम्यान जुने रेल्वे रूळ बदलून तेथे नवीन रूळ टाकण्याचे काम मागील काही महिन्यांत सुरू आहे. याच दरम्यान वडगाव निळा स्थानकाजवळ स्टॉकमध्ये ठेवलेले रेल्वे रूळ गायब झाल्याचे प्रकरण घडले. यामध्ये परभणी आरपीएफ ठाण्यात गुन्हा नोंद झाला. आरपीएफ पोलिसांकडून परभणी, परळी, जालना, नांदेड अशा ठिकाणी चौकशी करून तपास सुरू होता. यामध्ये रेल्वेतील अधिकाऱ्याचा समावेश असल्याची कुणकुण लागली होती. त्यानुसार पोलिसांनी हा तपास सुरू केला. रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक एस. बी. कांबळे, नांदेड सीआयडी यासह विशेष पथक तपासासाठी निश्चित केले आहे. त्यानुसार २१ फेब्रुवारीला गंगाखेडला शेख रशीद यास रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. हायड्रा व साहित्य पुरवठा करणाऱ्या शेख रशीद याच्या माध्यमातून पुढील तपास पोलिसांनी केला. आता चार ते पाच आरोपी फरार असून त्यांच्या शोधासाठी ही पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत.

आरोपी रेल्वे अभियंतापूर्णा सेक्शनअंतर्गत रेल्वेच्या परभणी, परळी मार्गावरील रेल्वे अभियंता म्हणून जबाबदारी असलेल्या एम. सतीश बाबू याचाही यात आरोपी म्हणून समावेश असल्याचे आरपीएफ पोलिस निरीक्षक एस. बी. कांबळे यांनी सांगितले. एम. सतीश बाबू हा हैदराबादला रेल्वे रुग्णालयात उपचार घेत आहे. या संदर्भात आरपीएफने सदरील रुग्णालयातसुद्धा कर्मचारी तैनात करून रेल्वेच्या डॉक्टरांसह अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती दिली. त्यामुळे सतीश बाबू याला ताब्यात घेतल्यावर पुढील तपास करणे सोपे होणार असल्याचे रेल्वे पोलिसांनी स्पष्ट केले.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी