शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत मास्क न वापरणाऱ्या १०५ जणांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 20:25 IST

परजिल्ह्यातून परभणी शहरात दाखल होणाऱ्या नागरिकांची पथकामार्फत तपासणी केली जात आहे़

ठळक मुद्देपरभणी महानगरपालिकेची मोहीम मास्क न वापरता फिरत होते नागरिक

परभणी : येथे महानगरपालिकेच्या पथकाने मंगळवारी सोशल डिस्टन्स व मास्कच्या नियमांचे पालन न करणाऱ्या १०५ नागरिकांवर प्रत्येकी २०० रूपये या प्रमाणे दंडात्मक कारवाई केली आहे़ 

शहरातील प्रभाग समिती क अंतर्गत वसमत रोडवरील श्री शिवाजी महाविद्यालयासमोर आणि पाथरी रस्त्यावर पथकाने ही कारवाई केली़ पाथरी रोड भागात ग्रामीण पोलीस ठाण्याचे गाडेकर, मनपाचे मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, राजू झोडपे, भीमराव लहाणे, प्रकाश काकडे यांनीही कारवाई केली़ शिवाजी महाविद्यालयाच्या परिसरात  पोलीस निरीक्षक रामेश्वर तट, महापालिकेचे सहायक आयुक्त सुधाकर किंगरे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली़ संचारबंदी लागू असतानाही नागरिक घराबाहेर पडत असून, मास्कचा वापर करीत नाहीत़ फिजिकल डिस्टन्सचे पालन केले जात नाही़ याविरूद्ध मनपाच्या पथकाने कारवाई करून २१ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे़ 

वालूरमध्ये ९ जणांवर कारवाई वालूर : वालूर गावात कोरोनाचे रूग्ण आढळल्यानंतरही ग्रामस्थ रस्त्यावर फिरत असून, मास्कचा वापर न करणाऱ्या ९ जणांवर मंगळवारी कारवाई करून त्यांच्याकडून १ हजार ८०० रूपये दंड वसूल केला आहे़ वालूर येथे कोरोनारूग्ण आढळले असून ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने हा परिसर सील केला आहे़ जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू केल्यानंतरही काही ग्रामस्थ मास्कचा वापर न करता गावात फिरत असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर पथकाने कारवाई सुरू केली़ नऊ जणांकडून १ हजार ८०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़ ही कारवाई जमादार संजय साळवे, पोलीस नाईक सईद रहीम, आऱएस़ जारवाल, ग्रां.प. कर्मचारी काशीनाथ जिवणे, महेमूद पठाण, ऋषी वाघमारे, प्रदीप सोनवणे, शेवाळे आदींनी केली़ 

तिन्ही रस्त्यांवर तपासणीपरजिल्ह्यातून परभणी शहरात दाखल होणाऱ्या नागरिकांची पथकामार्फत तपासणी केली जात आहे़ परभणी योद्धा म्हणून नियुक्त केलेले स्वयंसेवक, बापू सेवाभावी संस्थेचे सदस्य तसेच प्रभाग समितीचे कर्मचारी ही तपासणी करीत आहेत़ थर्मल गनच्या सहाय्याने तापीची नोंद घेतली जात असून, मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना दंड लावला जात आहे़ मंगळवारी मनपाने या तिन्ही रस्त्यावर तपासणी केली जात आहे़ दरम्यान, नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा, फिजिकल डिस्टन्सचे पालन करावे, असे आवाहन देविदास पवार यांनी केले आहे़  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी