शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

वारकऱ्यांची शान! रणेर कुटुंबाचा 'देवाचा अश्व' पुन्हा पालखीत, १०० वर्षांची अखंड परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 14:51 IST

वारीत सहभागी होण्यासाठी अश्वाचे बाभळगाव येथून विधिवत पूजा करून मिरवणूक काढून प्रस्थान झाले.

पाथरी ( परभणी) : पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथील रणेर कुटुंबीयांची पंढरपूर आषाढी वारीतील ‘देवाचा अश्व’ नेण्याची परंपरा तब्बल 100  वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. ही परंपरा संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याशी निगडित असून या अश्वाला वारीत विशेष मान दिला जातो. वारीत सहभागी होण्यासाठी 4 जून रोजी या  अश्वाचे बाभळगाव येथून विधिवत पूजा मिरवणूक काढून  प्रस्थान झाले. तत्पूर्वी गावात पूजा करून मिरवणूक काढण्यात आली. 

प्रथेनुसार, बाभळगावहून हा अश्व प्रथम थेट पंढरपूरला नेण्यात येतो. तेथे त्याची विधीपूर्वक पाद्यपूजा केली जाते. त्यानंतर हा अश्व देहू येथून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत पंढरपूरकडे पायी प्रवास करतो. वारीदरम्यान तो उभ्या आणि आडव्या रिंगणात सहभागी होतो आणि वारकऱ्यांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरतो. बाभळगाव येथून पूर्वी हा अश्व पंढरपूर पर्यंत पायी नेण्यात येत होता मात्र आता बाभळगाव येथून वाहनाने पंढरपूर पर्यंत नेण्यात येतो तेथून पुढे पायी दिंडीत सहभागी होतो. 

१०० वर्षांची परंपरा, तीन पिढ्यांनी जपलीरणेर कुटुंबीय या अश्वाची वर्षभर मुलासारखी काळजी घेतात. तो कोणत्याही इतर कामासाठी वापरला जात नाही. साधारणतः ८ ते ९ वर्षांनी हा अश्व बदलून नवीन अश्व स्वखर्चाने खरेदी केला जातो, तर जुना अश्व मानाने निवृत्त केला जातो. ही परंपरा वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचे आणि भक्तीचे प्रतीक मानली जाते. रणेर कुटुंबीयांनी ती तीन पिढ्यांपासून निष्ठेने जपली असून आजतागायत ती भावपूर्ण श्रद्धेने सुरू आहे. 4 जून रोजी या अश्वाचे बाभळगाव येथून पंढरपूर कडे प्रस्थान करण्यात आले. गावातून विधिवत पूजा करण्यात आली टाळ मृदंग वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली,  त्या नंतर अश्व प्रस्थान झाले.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीparabhaniपरभणीashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022