शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

पत्रकार परिषद :शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महसूलमंत्र्यांना साकडे घालणार-रमेश दुधाटे गोळेगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 01:03 IST

शेतकºयांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी तसेच गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये निर्माण झालेल्या समस्या सोडविण्या संदर्भात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना रविवारच्या दौºयात निवेदन देऊन साकडे घालणार असल्याची माहिती स्वच्छ भारत अभियानचे जिल्हाध्यक्ष रमेश दुधाटे गोळेगावकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शेतकºयांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी तसेच गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये निर्माण झालेल्या समस्या सोडविण्या संदर्भात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना रविवारच्या दौºयात निवेदन देऊन साकडे घालणार असल्याची माहिती स्वच्छ भारत अभियानचे जिल्हाध्यक्ष रमेश दुधाटे गोळेगावकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.महसूलमंत्री चंद्रकांत पाटील रविवारी जिल्ह्याच्या दौºयावर येत आहेत. या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत रमेश दुधाटे म्हणाले की, जिल्ह्यातील ७ तालुके गोदावरीच्या काठावर आहेत. या तालुक्यांमधील गोदाकाठावरील १५९ गावांमध्ये विविध मुलभूत प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामध्ये स्मशानभूमी, शेतकºयांचा विद्युत पुरवठा, दळण-वळणाच्या सुविधा, गोदावरी काठावरील गावांना एकमेकांशी जोडणे, निसर्गसंपन्न पर्यटनस्थळ असलेल्या जांभूळबेटचा विकास करणे, रेशीम, ऊस उत्पादक शेतकºयांच्या अडचणी सोडविणे आदीबाबत महसूलमंत्री पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. याशिवाय पिंगळी-लिमला-वझूर-रावराजूर- मरडसगाव या राज्य मार्ग ३५ वरील गोदावरी नदीवरील पुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी पूर्णा तालुक्यातील ५ पाणंद रस्त्यांच्या कामाचे उद्घाटनही करण्यात येणार आहे. त्यामध्ये वझूर-ठोळा पाणंद, वझूर ते रेणकापूर, वझूर ते वझूर शीव, वझूर ते बोरवण, वझूर ते खंडाळा या पाणंद रस्त्यांचा समावेश आहे. या पत्रकार परिषदेस अ‍ॅड.गंगाधरराव पवार, जि.प.सदस्य डॉ.सुभाष कदम, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, मेघना बोर्डीकर, वझूरचे सरपंच लक्ष्मण लांडे, रावराजूरचे सरपंच व्यंकटी काळे, मोहन कुलकर्णी, भीमराव वायवळ, सुरेश भुमरे आदींची उपस्थित होती.आज पुलाच्या कामाचे भूमिपूजनगोदावरी नदीवर वझूर गावाजवळ सा़बां़च्या वतीने १७ कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात येणाºया पुलाचे बांधकाममंत्री पाटील यांच्या हस्ते रविवारी सकाळी १० वाजता भूमिपूजन होणार आहे. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. गंगाधरराव पवार तर मार्गदर्शक म्हणून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, प्रमुख पाहुणे म्हणून पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, जलसंधारणमंत्री प्रा.राम शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खा.संजय जाधव, जि.प.अध्यक्षा उज्ज्वला राठोड, आ.विप्लव बजोरिजा, आ.डॉ.मधुसूदन केंद्रे, जि.प.सदस्य श्रीनिवास जोगदंड, अशोक बोखारे, माधवराव दुधाटे, आबासाहेब पवार, बबन पवार, मुंजाभाऊ शिंदे, अशोक शिंदे आदींची उपस्थिती राहणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीchandrakant patilचंद्रकांत पाटील