बोरी : जिंतूर तालुक्यातील बोरी येथील ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या वीज ग्राहकांकडून ५ लाख रुपयांची वसुली करण्यात आली असून २४ वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
बोरी येथील ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत १५ ते २० गावांना वीजपुरवठा केला जातो. मात्र, या गावातील बहुतांश वीज ग्राहकांकडे बिलाची वसुली थकीत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीला विजेच्या समस्या सोडविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे उपअभियंता राजेश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता ए. एस. गव्हाणे, एस. डी. आडभे, आर. डी. दांडगे, के. एस. युक्टे, एल. एस. बैनवाड, सय्यद युनूस यांच्या पथकाने वीज बिल वसुली मोहीम सुरू केली. या मोहिमेअंतर्गत ५ लाखांची वीज ग्राहकांकडून वसुली करण्यात आली असून २४ ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. दरम्यान, वीज बिल भरून वीज वितरण कंपनीला सहकार्य करावे, असे आवाहन अभियंता ए. एस. गव्हाणे यांनी केले.