जुगाऱ्यांवर कारवाई केली. या कारवाईत एकूण १ लाख ७० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
शहरातील गोदू गल्लीतील हनुमान मंत्री यांच्या घरातील वरच्या मजल्यावरील खोलीत पैसे लावून जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश कुमार यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक रमेश स्वामी, सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक ताठे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास खोले यांनी माहिती मिळालेल्या ठिकाणी शुक्रवारी १०.४५ वाजता धाड टाकली. तेव्हा ११ जण पैसे लावून जुगार खेळताना आढळून आले. या जुगाऱ्यांना ताब्यात घेऊन ५४ हजार रोख व १ लाख १५ हजार ४०० रुपयांचे आरोपीकडून मोबाईल असा एकूण १ लाख ७० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस नाईक बळीराम थोरे यांच्या तक्रारीवरून ११जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.