शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी उधळला दरोड्याचा प्लॅन, घातक शस्त्रासह चौघे अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 17:49 IST

एक जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला आहे.

- सत्यशील धबडगेमानवत ( परभणी) : प्राण घातक हत्यारासह दरोडा टाकण्याची तयारीने कारमधून परभणीकडे जाणाऱ्या चौघांना मोठ्या शिताफीने मानवत पोलिसांनी आज पहाटे 3: 30 वाजता अटक केली. यावेळी एक कार, धारदार शस्त्र आणि इतर साहित्य असा एकूण तीन लाख २६ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

शहरात पो नि  संदीप बोरकर पो उ नि विष्णुपंत घोडके,पो ह शेख जावेद, बंकट लटपटे, सय्यद फैयाज यांचे पथक शुक्रवारी रात्री गस्तीवर होते. पहाटे ३ वाजता विनानंबरच्या कारमध्ये  काहीजण दरोडा टाकण्याच्या तयारीने परभणीकडे जात असल्याची गोपनीय माहिती या पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी शहरातील महाराणा प्रताप चौकात संशयित वाहनांची तपासणी सुरू केली.

दरम्यान, पहाटे 3.30 वाजता एक कार रस्त्यावरील शोरुमजवळ असलेल्या रस्त्याच्या खाली जाऊन थांबली. याचेवेळी पोलिसांनी तिकडे धाव घेतली असता एकजण गाडीतून उतरून पसार झाला. तर शैलेश कारभारी भोसले, सतिश रामभाउ चव्हाण ( रा लिंबा ता पाथरी) , सोनुसिंग पुनमसिंग टाक ( रा. उड्डाण पुल नवा मोंढा परभणी) , जितेंद्रसिंग अवतारसिंग जुन्नी ( रा विकास नगर, परभणी) यांना पोलिसांनी अटक केली. कारची तपासणी केली असता त्यात प्राणघातक हत्यार, दरोडा टाकण्यास उपयोगी साहित्य आढळून आले. याप्रकरणी पोउनि विष्णुपंत घोडके यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तर एक जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास संदीप बोरकर करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी