शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

परभणी जिल्हा नियोजनसाठी १२० कोटी प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 00:23 IST

विविध शासकीय यंत्रणांमार्फत जिल्ह्यात पायाभूत विकासाबरोबरच आरोग्य आणि सामाजिक विकास साध्य करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीला मंजूर झालेल्या १५२ कोटी २९ लाख रुपयांपैकी ७० टक्के रक्कम १२० कोटी ५८ लाख रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत़ या निधीतून विविध यंत्रणांना विकास कामांसाठी रक्कम उपलब्ध करून दिली जाणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : विविध शासकीय यंत्रणांमार्फत जिल्ह्यात पायाभूत विकासाबरोबरच आरोग्य आणि सामाजिक विकास साध्य करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीला मंजूर झालेल्या १५२ कोटी २९ लाख रुपयांपैकी ७० टक्के रक्कम १२० कोटी ५८ लाख रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत़ या निधीतून विविध यंत्रणांना विकास कामांसाठी रक्कम उपलब्ध करून दिली जाणार आहे़जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत विविध उपाययोजना राबविल्या जातात़ या अंतर्गत कृषी, आरोग्य, रोजगार आणि शैक्षणिक क्षेत्रात कामांना मंजुरी दिली जाते़ राज्य शासनाच्या यंत्रणांमार्फत ही कामे केली जातात़ २०१८-१९ या वर्षासाठी जिल्हा वार्षिक नियोजन समितीने सादर केलेल्या १५२ कोटी २९ लाख रुपयांच्या तरतुदीला मंजुरी मिळाली आहे़ या तरतुदीतून जिल्हाभरात विकास कामांना निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे़ यासाठी मंजूर तरतुदीच्या ७० टक्के रक्कम राज्य शासनाकडून प्राप्त झाल्याने विकास कामांचा मार्ग मोकळा झाला आहे़ जिल्हा नियोजन समितीमार्फत कृषी व कृषी सेवा संलग्न सेवांसाठी १६ कोटी ४६ लाख ३२ हजारांची तरतूद मंजूर आहे़ त्यापैकी १२ कोटी १९ लाख ३७ हजार रुपये प्रशासनाला प्राप्त झाले आहेत़ त्यात पीक संवर्धनासाठी ६ कोटी ४७ लाख ८२ हजार रुपये, मृद व जल संधारणासाठी ३ कोटी ५३ लाख ५० हजार रुपये, पशू संवर्धनासाठी १ कोटी १२ लाख ८२ हजार रुपये, दुग्ध शाळा विकासासाठी १४ लाख रुपये, मत्स्य व्यवसायासाठी २ लाख ३१ हजार, वने व वन्य जीवन विकासासाठी ५३ लाख ९० हजार रुपये व सहकार क्षेत्रांतर्गत डॉ़ पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत ३५ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे़ त्याचप्रमाणे ग्रामविकासांतर्गत ग्रामीण रोजगारासाठी ६१ लाख १२ हजार, सामूहिक विकासासाठी १ कोटी ७५ लाख ७० हजार, पाटबंधारे व पूर नियंत्रणासाठी ६ कोटी २३ लाख, सामान्य शिक्षणांतर्गत २ कोटी ६६ लाखांचा निधी मंजूर झाला असून, त्यामध्ये प्राथमिक शाळेचे इमारत बांधकाम, शाळांची विशेष दुरुस्ती, दुर्बल घटकांतील मुलींचा उपस्थिती भत्ता यासाठी ही रक्कम दिली जाणार आहे़ तंत्र शिक्षणासाठी ३ लाख ५० हजार रुपये, लोक वाचनालयासाठी ७ लाख ७० हजार रुपये, क्रीडा व युवक कल्याणासाठी १ कोटी ६ लाख ४० हजार, महिला बालकल्याणासाठी १ लाख ४० हजार, कामगार व कामगार कल्याणासाठी २ कोटी ९४ लाख, सार्वजनिक आरोग्याच्या उपाययोजना राबवण्यिासाठी ४ कोटी ४७ लाख ३० हजार, ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छतेसाठी ३९ कोटी ५५ लाख ७९ हजार, गृह निर्माणासाठी १३ लाख ३० हजार, नगरविकासासाठी ९ कोटी ८० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे़बिगर गाभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या उर्जा विकासासाठी २ कोटी ६३ लाख २० हजार रुपये आणि ग्रामीण आणि लघु उद्योगासाठी ४८ लाख ३० हजार रुपये तसेच रस्ते आणि पुलांच्या उभारणीसाठी २४ कोटी ९५ लाख ५ हजार रुपये, विविध शासकीय कार्यालयांच्या इमारत बांधकामसाठी १ कोटी ९६ लाख ८२ हजार, तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी ८८ लाख ९० हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे़ एकूण बिगर गाभा क्षेत्रासाठी ३३ कोटी १९ लाख ६० हजार रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत़प्रस्ताव आल्यानंतर होणार वितरणविविध विकास कामांसाठी जिल्हा प्रशासनाला १२० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे़ जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निधी वितरणासंदर्भात निर्णय होणार आहे़ परंतु, त्यापूर्वी शासकीय यंत्रणांनी त्यांना मंजूर झालेल्या तरतूदीतून करावयाच्या कामांचे प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर करणे आवश्यक आहे़ हे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतरच त्यास मंजुरी देऊन हा निधी त्या त्या यंत्रणांना वितरित केला जाणार आहे़ त्यामुळे प्रशासनाला निधी प्राप्त असला तरी कामांचे आराखडे तयार करण्याची जबाबदारी यंत्रणांची असून, या यंत्रणांनी त्यासाठी पाठपुरावा करण्याची गरज निर्माण झाली आहे़विकासकामांसाठी नियोजनाची गरजमागील काही वर्षांचा अनुभव लक्षात घेता, नियोजन समिती मार्फत विकासकामांसाठी निधी प्राप्त होतो. मात्र शासकीय यंत्रणा हा निधी वेळेत खर्च करीत नाहीत. मार्च एण्डच्या तोंडावर निधी खर्चण्याची धावपळ होते. आतापासून विकासकामांचे योग्य नियोजन करुन निधी खर्च केला तर प्राप्त झालेल्या निधीतून खºया अर्थाने विकासकामे होऊ शकतात. तेव्हा यंत्रणांनीही पुढाकार घेण्याची गरज आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीfundsनिधी