शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत पेट्रोलच्या दराचा उच्चांक; ९३.६९ रुपये प्रतिलिटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2021 06:08 IST

याशिवाय अनेक शहरांमध्ये पेट्राेल आणि डिझेलचे दर उच्चांकी पातळीवर पाेहाेचले आहेत. इंधनाचे दर उच्चांकी पातळीवर पाेहाेचल्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे माेडले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्यानंतर तेल वितरक कंपन्यांनी पेट्राेल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे डिझेलचे दर मुंबईत आतापर्यंतच्या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पाेहाेचले असून, पेट्राेलचे दरही त्याच मार्गावर आहेत. महाराष्ट्रात पेट्राेलचे सर्वाधिक दर परभणीमध्ये असून, तेथे ९३.६९ रुपये प्रतिलिटर या विक्रमी पातळीवर दर पाेहाेचले आहेत.

याशिवाय अनेक शहरांमध्ये पेट्राेल आणि डिझेलचे दर उच्चांकी पातळीवर पाेहाेचले आहेत. इंधनाचे दर उच्चांकी पातळीवर पाेहाेचल्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे माेडले आहे. तेल कंपन्यांनी पेट्राेलच्या दरात २५ पैसे तर डिझेलच्या दरात २६ पैशांनी वाढ केली. त्यामुळे डिझेलचे दर मुंबईत ८१.५८ रुपये प्रतिलिटर झाले आहेत.  

मुंबईत ४ ऑक्टाेबर २०१८ ला पेट्राेलचे दर ९१.३९ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर हाेते. त्यावेळी कच्च्या तेलाचे दर ८० डाॅलर्स प्रतिबॅरेल एवढे हाेते. आता ते ५५.९५ डाॅलर्स प्रतिबॅरेल इतके आहेत. सध्या कच्च्या तेलाचे दर  ५० टक्क्यांनी वाढले आहेत. काेराेनाविरुद्ध लसीकरण सुरू हाेणार आहे. त्यामुळे जगभरात इंधनाची मागणी वाढली आहे. तसेच आखाती देशांनी विशेषत: साैदीने कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट करण्याचा निर्णय घेतल्यामुळे कच्च्या तेलाचे दर आणखी वाढू शकतात. देशात सर्वात महाग पेट्राेल आणि डिझेल राजस्थानमधील गंगानगर येथे आहे. येथे पेट्राेल ९६.६३ रुपये, तर डिझेलचे दर ८८.३० रुपये एवढे आहेत.

उत्पादन शुल्कात  झाली मोठी वाढकेंद्र सरकारकडून सध्या पेट्राेलवर ३२.९८ रुपये, तर डिझेलवर ३१.८३ रुपये उत्पादन शुल्क आकारण्यात येते, तर महाराष्ट्र सरकारकडून पेट्राेल आणि डिझेलवर अनुक्रमे २६ आणि २४ टक्के व्हॅट आकारला जाताे. त्यावर अनुक्रमे १०.२० रुपये आणि ३ रुपये सेसही घेण्यात येताे. 

टॅग्स :Parbhani spपोलीस अधीक्षक, परभणीPetrolपेट्रोलMumbaiमुंबई