दुसऱ्या लाटेत केलेल्या कोरोना चाचणी - २ लाख ३१९
आढळलेले पॉझिटिव्ह ३७ हजार ७४२
मागील चार दिवसात केलेल्या कारवाई
विनामास्क फिरणारे १,९४४
आकारलेला दंड ३ लाख ७० हजार ५७८
किरकोळ कारणांसाठी बाहेर फिरणारे अधिक
शहरात पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासणीमध्ये नागरिक विनाकारण फिरताना आढळल्यास भाजीपाला, फळखरेदी, औषधी आणणे तर काहीजण रुग्णाला डब्बा द्यायला तसेच काहीजण दवाखान्यात जात असल्याचे नेहमीचीच कारणे सांगत आहेत. यामुळे बाहेर पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
शहरात तीन ठिकाणी चाचणी केंद्र
शहरात शिवाजी चौक, काळी कमान, जाम नाका येथे दिवसभर तर रेल्वेस्थानक येथे ठराविक वेळेसाठी तपासणी केल्या जात आहेत. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि गावपातळीवर सुद्धा आरटीपीसीआर चाचणी मोहीम राबविली जात आहे. १७ ते २० मे या चार दिवसाच्या कालावधीत १६ हजार २२५ जणांच्या तपासणी करण्यात आल्या आहेत.