शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

साई जन्मभूमीवर पाथरीकर ठाम; आमचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतरच निर्णय घेण्याची केली मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 13:45 IST

महाआरतीनंतर सर्वपक्षीय बैठकीतील सूर

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी आम्हालाही चर्चेसाठी बोलवावे, त्यानंतरच निर्णय घ्यावा.  मराठवाड्यातील सर्व आमदार, खासदार एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांकडे बाजू मांडू

पाथरी- साई जन्मभूमीच्या संदर्भात शासनाने आमचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतरच निर्णय घ्यावा, असा सूर पाथरी येथे मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी मांडला. तत्पूर्वी दीड हजार भाविकांच्या उपस्थितीत श्री सार्इंची महाआरती करण्यात आली.

श्री साई जन्मभूमी स्थळावरुन शिर्डीकरांनी वाद उपस्थित केल्यानंतर सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिर्डीतील शिष्टमंळाची बैठक झाली. त्यानंतर पाथरी येथील देवस्थानचा तीर्थक्षेत्र म्हणून विकास केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. या सर्व पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी १२ वाजता पाथरी येथील साई मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली. यावेळी लोकप्रतिनिधींसह जिल्हाभरातील सुमारे दीड हजारहून अधिक भाविक  उपस्थित होते. या महाआरतीनंतर खा.बंडू जाधव, कृती समितीचे अध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी, आ.डॉ.राहुल पाटील, आ.सुरेश वरपूडकर, माजी आ.विजय भांबळे, माजी आ.मोहन फड या नेत्यांसह जिल्हाभरातील राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि भाविकांच्या उपस्थितीत पाथरी येथे बैठक सुरु आहे. या बैठकीत शासनाने आमचे म्हणणे ऐकून न घेता निर्णय घेऊ नये. जन्मस्थळावर आम्ही ठाम आहोत, असा सूर उमटला. 

यावेळी आ.बाबाजानी दुर्राणी म्हणाले, साई जन्मभूमी म्हणूनच शासनाकडे आराखडा दाखल झाला असून त्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. एखाद्या मुद्यावरुन वाद असेल तर दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हालाही चर्चेसाठी बोलवावे, त्यानंतरच निर्णय घ्यावा. 

आ.सुरेश वरपूडकर म्हणाले, साईबाबा जन्मस्थळाच्या विकासासाठीच आम्ही निधी मागितला. मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणा केली. शिर्डीकरांकडून विरोध झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जन्मभूमीचा मुद्दा बाजुला ठेवू, असे वक्तव्य केले आहे. त्यावर मराठवाड्यातील सर्व आमदार, खासदार एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांकडे बाजू मांडू, असे वरपूडकर म्हणाले. यावेळी आ.डॉ.राहुल पाटील यांनीही मार्गदर्शन केले. एकंदर पाथरी येथील साई जन्मस्थळाच्या मुद्यावर सर्वजण ठाम असून जन्मस्थळ म्हणूनच पाथरी येथील साई मंदिराचा विकास करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

बुधवारी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट 

दरम्यान, विश्वस्त मंडळ आणि सर्वपक्षीय नेते बुधवारी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या वादावर तोडगा काढण्यासाठी एक समिती स्थापन करावी अशी मागणीसुद्धा पाथरीकरांनी बैठकीत केली आहे.  अशा आशयाचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला.

टॅग्स :saibabaसाईबाबाpathriपाथरीparabhaniपरभणी