शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पाथरी तालुक्यात पशु दवाखान्यांत लसीच्या तुटवड्याने ३० हजार पशुधन वार्‍यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 18:26 IST

पाथरी तालुक्यातील पशु वैद्यकीय दवाखान्यात लसीचा तुटवडा जाणवत असल्याने पशुपालकांना पशुवर उपचार करण्यासाठी आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. लसीच्या तुटवड्याने तालुक्यातील तब्बल ३० हजार पशुधन मात्र वा-यावर आहे. 

पाथरी (परभणी) : तालुक्यातील पशु वैद्यकीय दवाखान्यात लसीचा तुटवडा जाणवत असल्याने पशुपालकांना पशुवर उपचार करण्यासाठी आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. लसीच्या तुटवड्याने तालुक्यातील तब्बल ३० हजार पशुधन मात्र वा-यावर आहे. 

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत तालुका स्तरावर पशु वैद्यकीय दवाखाने आहेत. तालुक्यातील हदगाव बु., हदगाव खु., गुंज खु. आणि वाघाळा या ठिकाणी श्रेणी २ चे पशु वैद्यकीय दवाखाने आहेत. जिल्हा परिषदेमार्फत या दवाखान्यांना लसीचा पुरवठा केला जातो. पशुधनाला विविध आजार उद्भवू नयेत, यासाठी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी जनावरांच्या संख्येनुसार विविध लस व औषधींचा पुरवठा करण्यात येतो. जनावरांना घटसर्प, फर्‍या, लाळ, खुरकत या सोबतच शेळ्या, मेंढ्यासाठी इटीव्ही, पीटीआर या लसी उपाययोजना म्हणून देण्यात येतात. 

यावर्षी पशु वैद्यकीय दवाखान्याला कोणत्याच लसीचा पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे ६ ते ८ महिन्यापासून दवाखान्यात लस उपलब्ध नाही. जनावरांना लस उपलब्ध होत नसल्याने विविध आजार बळावत आहेत. त्यामुळे पशुपालकांना जनावरांवर उपचार करण्यासाठी खाजगी व्यवसायिकांकडे जावे लागत आहे. यामध्ये वेळ व पैसा दोन्ही खर्च करावे लागत आहेत. 

दरम्यान, गोदाकाठच्या जनावरांना दरवर्षी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये लाळ खुरकत या रोगाची मोठ्या प्रमाणात लागण होते. यासाठी लाळखुरकत या लसीकरणाची आवश्यकता असते. परंतु आॅक्टोबर महिन्यात उपलब्ध होणारी लस अद्यापही जिल्हा पशु संवर्धन विभागाकडे उपलब्ध झालेली नाही. यामुळे पशुपालकातून चिंता व्यक्त केली जाते.

अधिकार्‍यांचे अपडाऊनतालुक्यामध्ये जवळपास ३० हजार पशुधन आहेत. विविध आजार जडत असल्याने पशुपालकांना उपचारासाठी वैद्यकीय दवाखान्यात जावे लागते. परंतु अनेकवेळा पशु वैद्यकीय अधिकारी दवाखान्यामध्ये उपलब्ध होत नाहीत. काही वैद्यकीय अधिकारी तर अपडाऊन करीत असल्याने सेवकांवरच दवाखान्याचा भार येत आहे. पशु वैद्यकीय अधिकार्‍यांच्या अनुपस्थितीत सेवकच  जनावरांवर उपचार करीत आहेत. यामध्ये जनावरांच्या जीवाचा धोका निर्माण होत आहे. यामुळे पशुपालकांत संताप व्यक्त होत आहे.

तातडीने पुरवठा केला जाईल. जनावरांसाठी शासनाकडून लस मिळते. जूनपूर्वी काही लस उपलब्ध झाल्या होत्या. त्याचे वाटपही करण्यात आले होते. परंतु लाळ खुरकतची लस अद्यापही उपलब्ब्ध झाली नाही. लस उपलब्ध होताच तालुक्याला तातडीने पुरवठा केला जाईल. - डी.टी. वाघमारे, जिल्हा पशू संवर्धन अधिकारी

पाठपुरावा केला जात आहे. जनावरांना दिल्या जाणार्‍या लसी शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून दिल्या जातात. तालुक्यात काही लस उपलब्ध झाल्या नाहीत. यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. - भावनाताई नखाते,उपाध्यक्षा,जिल्हा परिषद

टॅग्स :parabhaniपरभणी