शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
3
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
4
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
5
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
6
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
7
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
8
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
9
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
10
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
11
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
12
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
13
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
14
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
15
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
16
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
17
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
18
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
19
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
20
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका

पाथरीत व्यापा-याकडून कवडीमोल दराने तुरीची खरेदी; हमीभाव केंद्र सुरू करण्यास होतोय विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 15:45 IST

परभणीसह सेलू आणि जिंतूर येथे शासनाने हमी भाव खरेदी केंद्र सुरू केले असले तरी मानवत येथील हमी भाव केंद्र सुरू करण्यास विलंब लावला जात असल्याने व्यापारी याचा लाभ उठवित असून, हमीभावापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी होत आहे. त्यामुळे तुरीचे मोठे उत्पादन होऊनही शेतकर्‍यांना आर्थिक फटकाच सहन करावा लागत आहे. 

- विठ्ठल भिसे

पाथरी ( परभणी ): परभणीसह सेलू आणि जिंतूर येथे शासनाने हमी भाव खरेदी केंद्र सुरू केले असले तरी मानवत येथील हमी भाव केंद्र सुरू करण्यास विलंब लावला जात असल्याने व्यापारी याचा लाभ उठवित असून, हमीभावापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी होत आहे. त्यामुळे तुरीचे मोठे उत्पादन होऊनही शेतकर्‍यांना आर्थिक फटकाच सहन करावा लागत आहे. 

पाथरी तालुक्यामध्ये यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये ४ हजार २६० हेक्टवर तुरीचा पेरा करण्यात आला. सध्या तूर काढणी जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे. अनेक शेतकर्‍यांना ९ ते १० क्विंटल तुरीचा उतारा मिळत आहे. खरिपातील कापूस पीक बोंडअळीेने फस्त केल्याने तूर पिकावरच शेतकर्‍यांची मदार आहे. सध्या बाजारपेठेत तुरीची आवक सुरू असून शासनाने हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पाथरी आणि मानवत या दोन तालुक्यांसाठी गतवर्षीप्रमाणे एकत्र खरेदी केंद्र सुरू होणार आहे. परंतु, हे केंद्र सुरू झाले नाही.

गतवर्षी राज्य शासनाने तुरीला ५०५० रुपये हमीभाव दिला होता. यावर्षी मात्र ५ हजार २५० रुपये हमी दर व २०० रुपये बोनस असा ५ हजार ४५० रुपये दर जाहीर केला आहे. तसेच शासनाने प्रत्येक शेतकर्‍यांची ७.५० क्विंटल तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याने अडचण निर्माण झाली आहे. खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने तालुक्यातील तूर उत्पादक शेतकरी व्यापार्‍यांच्या दारामध्ये तूर आणत आहेत. व्यापार्‍यांकडून ४ हजार ते ४२०० रुपये प्रती क्विंटल एवढ्या कवडीमोल दराने तूर खरेदी केली जात आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी त्रस्त झाला आहे. पाथरी व मानवत तालुक्यासाठी मानवत येथे तूर खरेदी केंद्र सुरू होणार असल्याने खरेदीसाठी आॅनलाईन नोंदणी केली जात आहे. दोन्ही तालुक्यातील १४०० शेतकर्‍यांची नोंदणी झाली असून आणखी १२०० शेतकर्‍यांनी अर्ज दाखल केले आहेत.  मात्र खरेदी केंद्रच सुरू नसल्याने शेतकर्‍यांना कवडीमोल दराने तूर विक्री करावी लागत आहे.

केंद्र सुरू करण्यास जाणीवपूर्वक विलंबएक महिन्यापासून तूर बाजारात विक्रीसाठी दाखल झाली आहे. मात्र अद्याप मानवत येथील हमीभाव तूर खरेदी केंद्र सुरू झाले नाही. विदर्भ फेडरेशनच्या वतीने मानवत येथे तूर खरेदी केंद्र सुरू केले जाणार आहे. अधिकाधिक शेतकर्‍यांची तूर खाजगी बाजारपेठेत विक्री व्हावी, जेणे करुन शिल्लक राहिलेलीच तूर हमी भाव केंद्रावरुन खरेदी होईल, या उद्देशाने हमी भाव केंद्र सुरू करण्यास जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे, असा आरोप आता तूर उत्पादक शेतकरी करीत आहेत. शुक्रवारपासून जिल्ह्यात तीन खरेदी केंद्र सुरू झाले मात्र, यात मानवत खरेदी केंद्राचा समावेश नसल्याने शेतकर्‍यांचा रोष वाढला आहे

पाथरीत केंद्र सुरू करण्यासाठी प्रस्तावपाथरी तालुक्यातील शेतकर्‍यांची गैरसोय लक्षात घेता पाथरी येथे हमीभाव तूर खरेदी केंद्र सुरू करावे, असा प्रस्ताव बाजार समितीने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन कार्यालयाकडे सादर केला आहे. यासाठी १ हजार मे.टन क्षमता असलेले गोदामही उपलब्ध करून दिल्याची माहिती बाजार समितीचे सचिव बापू कुटे यांंनी दिली आहे. 

पाथरी बाजार समितीने तूर खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात कळविले असले तरी पाथरी येथील खरेदी विक्री संघ अ वर्ग सभासद नाही. पायाभूत सुविधा नाहीत. त्यामुळे पाथरी येथे खरेदी केंद्र सुरू होण्यास अडचणी असल्याची माहिती फेडरेशनच्या अधिकार्‍यांनी दिली.किमान मानवत येथील हमी भाव तूर केंद्र तातडीने सुरू करण्यासाठी मार्केटिंग फेडरेशनने प्रयत्न करावेत, अशी मागणी शेतकर्‍यांतून जोर धरत आहे.

शासनाकडून परवानगीचे प्रयत्न सुरु पाथरी येथे हमीभाव तूर खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी व्यापार्‍यांकडील दोन्ही गोदाम खाली करून घेतले आहेत. शासनाकडे तशी मागणी करण्यात आली आहे. शासनाकडून परवानगी घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. - अनिल नखाते, सभापती, बाजार समिती

अनेक अडचणी येत आहेत दोन्ही तालुक्यासाठी एकच खरेदी केंद्र मानवत येथे असल्याने नाव नोंदणीपासून अडचणी आहेत. तुरीच्या मापातही अडचणी वाढणार असून ही बाब शेतकर्‍यांसाठी बाधक आहे.- माणिक भिसे, व्यवस्थापक खरेदी विक्री संघ

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी