शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंगवरून गोळीबार प्रकरणातील आरोपीस अंबाजोगाई येथून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 15:22 IST

या घटनेने पाथरी शहरातील अजीज मोहल्ला परिसरात दहशत पसरली होती.

ठळक मुद्देपाथरी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून कारवाई

पाथरी - घरासमोर कार पार्किंग केल्याच्या कारणावरून झालेल्या बाचाबाचीनंतर गोळीबार झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली होती या प्रकरणातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अंबाजोगाई येथून  10 सप्टेंबर रोजी ताब्यात घेऊन पाथरी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले

पाथरी शहरातील अजीज मोहल्ला भागात 8 सप्टेंबर मंगळवारी रात्री 12 च्या सुमारास घरासमोर गाडी पार्क करण्याच्या कारणावरून शिवीगाळकरून  बाचाबाची झाली. त्यानंतर मोहमद बिन सईद बिन किलेब चाऊस यांनी आपल्या कमरेची रिव्हाल्व्हर काढून सलाम बिन सालेम बिन हवेल यांच्यावर गोळीबार केला. या घटनेने परिसरात दहशत पसरली होती. या प्रकरणी 9 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आर रागसुद्धा, सहायक पोलिस अधीक्षक श्रवण दत्त , आणि स्थानिक गुन्हा शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते, पोलिसांनी आरोपीच्या घराची आणि मिलची झाडाझडती घेतली. परभणीरोडवरील मीलमध्ये टेबलच्या कप्प्यात दोन धारदार लोखंडी खंजीर आढळून आले. 

यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक  यांच्या आदेशाने पथकातील सहायल पोलीस निरीक्षक शरद विपट, सुगीरव केंद्रे, निलेश भुजबळ जमीर फारोकी,शंकर गायकवाड ,कांबळे यांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीचा शोध सुरू केला. आरोपी अंबाजोगाई येथे असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पथकाने थेट अंबाजोगाई गाठून एका धाब्यावरुन आरोपीस ताब्यात घेतले. गुरुवारी सकाळी पाथरी पोलीस ठाण्यात हजर केले.

टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी