शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल सर्वेक्षणात परभणी आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 23:26 IST

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात केलेल्या सर्वेक्षणात परभणी तालुक्याने आघाडी घेतली असून, तालुक्यातील २४ हजार ८७१ लाभार्थ्यांचे प्रपत्र भरुन घेण्यात आले आहेत. इतर तालुक्यात मात्र या सर्वेक्षणाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात केलेल्या सर्वेक्षणात परभणी तालुक्याने आघाडी घेतली असून, तालुक्यातील २४ हजार ८७१ लाभार्थ्यांचे प्रपत्र भरुन घेण्यात आले आहेत. इतर तालुक्यात मात्र या सर्वेक्षणाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री घरकुल आवास योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. मात्र अनेक लाभार्थी पात्र असतानाही त्यांची नावे योजनेत समाविष्ट झाली नसल्याने जिल्हा परिषद स्तरावर ग्रामीण भागामध्ये लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करुन त्यांच्याकडून प्रपत्र ड भरुन घेण्याची मोहीम राबविण्यात आली. १ ते ३० सप्टेंबर या काळात प्रत्येक पंचायत समिती अंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांची महिती घेऊन त्यांच्याकडून प्रपत्र ड भरण्याचे काम करण्यात आले. प्रपत्र ड आॅनलाईन अपलोड करण्यासाठीही कंत्राटी तत्त्वावर आॅपरेटर नियुक्त केले होते.लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करुन प्रपत्र ड भरुन घेण्यासाठी ३० सप्टेंबर ही अंतिम मुदत होती. या काळात प्रत्येक पंचायत समिती अंतर्गत कामकाज करण्यात आले. त्यात परभणी तालुक्यात सर्वाधिक २४ हजार ८७१ लाभार्थ्यांचे प्रपत्र भरण्यात आले आहेत.परभणी तालुक्यासाठी ३७ हजार लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करुन त्यांचे प्रपत्र भरुन घेण्याचे उद्दीष्ट दिले होते. त्या तुलनेत २४ हजार ८७१ लाभार्थ्यांचे प्रपत्र आॅनलाईन भरुन पूर्ण झाले आहे. प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत संपली असून, परभणी तालुक्यातील सर्वाधिक लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.सोनपेठ तालुक्यात अल्प प्रतिसादपरभणी जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामीण लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ देण्यासाठी एक महिन्याच्या कालावधीत सर्वेक्षण करण्यात आले. त्यात सोनपेठ तालुक्यात अल्प प्रतिसाद मिळाला आहे. या तालुक्यामध्ये केवळ ७ हजार ५०१ लाभार्थ्यांचेच प्रपत्र भरण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे गंगाखेड तालुक्यात १७ हजार २६, जिंतूर- २३ हजार ८४६, मानवत- ९ हजार ७४, पालम- ९ हजार ७१८, परभणी- २४ हजार ८७१, पाथरी - ९ हजार २ आणि पूर्णा तालुक्यात ११ हजार ५२७ आणि सेलू तालुक्यात ११ हजार ७२३ असे एकूण १ लाख २४ हजार २८८ लाभार्थ्यांचे आॅनलाईन प्रपत्र ड भरण्यात आले आहेत.मुदतवाढ मिळाल्यास वाढतील लाभार्थीपरभणी तालुक्यामध्ये ५ हजार १२९ लाभार्थ्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. मात्र मुदत संपल्याने या लाभार्थ्यांचे फोटो अपलोड करणे बाकी आहे. शासनाने प्रपत्र ड भरण्यासाठी मुदतवाढ दिली तर उर्वरित लाभार्थ्यांचीही आॅनलाईन नोंदणी करुन त्यांना योजनेचा लाभ मिळेल, या दृष्टीने प्रयत्न केले जातील, अशी माहिती परभणी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ए.एस. सारुक यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीHomeघर