शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत खरी काँटे की टक्कर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 04:45 IST

परभणी मतदारसंघात १७ उमेदवार निवडणूक रिंगणात असले, तरी खरी लढत शिवसेनेचे विद्यमान खा. संजय उर्फ बंडू जाधव व राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर यांच्यातच होत आहे.

परभणी मतदारसंघात १७ उमेदवार निवडणूक रिंगणात असले, तरी खरी लढत शिवसेनेचे विद्यमान खा. संजय उर्फ बंडू जाधव व राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर यांच्यातच होत आहे. दोघेही तगडे उमेदवार असल्याने लढतीत चुरस आहे.>सामाजिक उपक्रमावर भरशिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांनी प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत घेतलेल्या विकासात्मक निर्णयांची माहिती प्रचारसभांमधून दिली आहे़ शिवाय शिवसेनेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सामूहिक विवाह सोहळे, आरोग्य शिबिर, दुष्काळग्रस्तांना मदत आदी उपक्रमांची माहिती देण्यावरही भर दिला़ शिवाय स्थानिक प्रश्नांवर केलेल्या आंदोलनाची आठवणही मतदारांना करून दिली आहे़>पीकविमा हाच कळीचा मुद्दापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ५ वर्षांत घेतलेला नोटाबंदीचा निर्णय, बेरोजगारांना रोजगार देण्यात आलेले अपयश, जीएसटीची चुकीची अंमलबजावणी, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, पीकविम्यात जिल्ह्यावर झालेला अन्याय या प्रश्नांसह ३० वर्षांपासून परभणी मतदार संघ शिवसेनेच्या ताब्यात असताना विकास झाला नसल्याचा मुद्दा, तसेच खा़ संजय जाधव यांची कार्यपद्धती हे मुद्दे प्रचारात मांडले़>हेही उमेदवार रिंगणातवंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान, बहुजन समाज पार्टीचे उमेदवार डॉ़ वैजनाथ फड, कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडियाचे उमेदवार राजन क्षीरसागर यांच्यासह एकूण १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत़ या उमेदवारांनीही जोरदार प्रचार चालविला़ विशेषत: वंचित बहुजन आघाडीचे खान यांच्यासाठी अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी पूर्णा, पाथरीत जाहीर सभा घेऊन राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, भाजपवर प्रखर टीका केली़

टॅग्स :parbhani-pcपरभणीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019